Tuesday 8 October 2024

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सोमजाई मंदीर जिर्णोध्दारास १५ लाखांचा निधी

      बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) : भारतीय पेट्रोलियम व गॅस नियमक मंडळाचे चेअरमन, प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य, कोकण चे भाग्य विधाते, लोकप्रिय कार्य सम्राट खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या हस्ते सोमवार दिनांक ०७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बोरघर येथील गावदेवी सोमजाई माता मंदीर जिर्णोध्दार भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 
      सदर भूमीपूजन सोहळ्यात बोरघर ग्रामस्थ स्थानिक व मुंबई कर यांना बोरघर येथील गावदेवी सोमजाई माता मंदीर जिर्णोध्दार कार्यासाठी खासदार सुनील तटकरे साहेब यांनी यांच्या खासदार निधीतून १५ लाख रुपयांचा निधी देण्याचे घोषित करून त्या संबंधिचे आदेश पत्रक सुपुर्द केले. 
     सदर भूमीपूजन सोहळा प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना खासदार सुनील तटकरे साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा येथील ऐतिहासिक भेटीचा स्वाभिमानी किस्सा उपस्थित ग्रामस्थांना आवर्जून सांगितला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज इतके स्वाभिमानी होते की, ते बादशहा च्या भेटीसाठी दिवान ए खास च्या प्रशस्त दालनात कमी उंचीच्या दरवाज्यातून बादशहा पुढे मान न झूकवता ताठ मानेने विशिष्ट पद्धतीने पाय पुढे करून आत गेले. या पुढे बोलताना ते म्हणाले की, बोरघर येथील कार्यकर्त्यांनी सदर सोमजाई मंदीराचे काम जलदगतीने सुरू करून चैत्र पौर्णिमेच्या उत्सवाच्या आत परिपूर्ण करावे. 
      सदर भूमीपूजन सोहळ्यास सुभाष केकाणे कार्याध्यक्ष रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बाळाराम (काका ) नवगणे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महादेव बक्कम चिटणीस रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, संगिताताई बक्कम महिला अध्यक्षा माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, शैलेश दादा भोनकर, विभागीय अध्यक्ष तळाशेत जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राजू शिर्के, बोरघर अध्यक्ष राजाराम जाधव, उपाध्यक्ष दत्ताराम मोहे, सचिव दिलीप साखरे, खजिनदार दिनेश मोहे, पंडित शेडगे, सखाराम गायकवाड, माजी अध्यक्ष सुभाष मोहे, माजी उपाध्यक्ष पत्रकार विश्वास गायकवाड, माजी सचिव नथुराम साखरे, सुरेश मांगले, महेश मोहे, सखाराम मोहे, केरु मोहे, मनोहर वाघरे, उमाजी मोहे, रोहिदास मोहे, महादेव मांगले, रामदास जाधव, रमेश शिगवण, संतोष कळंबे,  दत्ताराम वाघरे, दिलीप कळंबे, विजय कळंबे, बळीराम कळंबे, रमेश कळंबे, सुभाष कालप, धोंडू वाघरे, दत्ताराम सुतार, नारायण मांगले, महादेव मोहे, सहदेव मोहे, दगडू मोहे, बाळू मोहे,चंद्रकांत सुतार, जनार्दन गायकवाड, रमेश गायकवाड, आकाराम गायकवाड, रमेश मांगले, नारायण नाक्ती, सुरेश मांगले, संजय सुतार, सुभाष मोरे, नावजी गावडे, सुभाष गोठल, प्रमिल शिगवण, रुपेश शिगवण, संतोष निंगावले, दत्ताराम म्हसकर, अशोक काशिम,भरत मोहे, तुकाराम मोहे, तुकाराम सुतार, सुभाष मोरे, शाम सुतार, मोतीराम सुतार, दिनकर वाघरे, अनिल वाघरे, रविंद्र भावे, गणेश भावे, सुधाकर मोरे, बोरघर ग्रामस्थ स्थानिक व मुंबईकर, महिला मंडळ, आमडोशी अध्यक्ष गणेश घुलघुले, पेण अध्यक्ष देवजी माने, रामभाऊ ढवळ, इत्यादी मान्यवर आणि महिला मंडळ उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...