Thursday 10 October 2024

समाजकार्य महाविद्यालयात आदिवासी समुदाय विकास कार्यक्रमावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न !!

समाजकार्य महाविद्यालयात आदिवासी समुदाय विकास कार्यक्रमावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न !!
 

चोपडा, प्रतिनिधी :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव प्रधानमंत्री उच्च स्तर शिक्षा अभियान व भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदिवासी समुदाय विकास कार्यक्रमावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन माननीय श्री अविनाश पाटील गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चोपडा यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले या कार्यशाळेचे उद्घाटन कार्यशाळेचे अध्यक्ष माननीय श्री. अरुणभाई गुजराथी (माजी विधानसभा अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री पवन कुमार पाटील (सहाय्यक प्रकल्प अधिकारी, यावल), श्री संदीप पाटील (विकास अधिकारी, यावल) माननीय सौ. पूनमताई गुजराथी (अध्यक्षा, भगिनी मंडळ चोपडा), श्री दीपक पाटील- केंद्रप्रमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर उपस्थित होते. उद्घाटन सत्राचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अरुणभाई गुजराथी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आदिवासी समुदायाच्या स्वच्छतेविषयी कौतुक केले. तसेच सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक, स्थिती जोपर्यंत इतर समाजाच्या बरोबरीने होत नाही तोपर्यंत आरक्षण दिले पाहिजेत, पायाभूत सुविधा वाढवली पाहिजे, शिक्षणाची जनजागृती केली पाहिजे, असे असे मत व्यक्त केले.सदर उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विनोद रायपुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. नारसिंग वळवी यांनी केले. सदर कार्यशाळाचार सत्रामध्ये घेण्यात आली. प्रथम सत्रामध्ये मा. श्री प्रकाश गेडाम- संयोजक जनजाती चेतना परिषद, विदर्भ प्रांत नागपुर यांनी वनवासी समाजातील धर्मांतराची समस्या ,प्रा. डॉ. जयेश पाडवी मु.जे. महाविद्यालय जळगाव यांनी आदिवासींविषयी संविधानिक तरतुदी, प्रा.के.के. वळवी - सेवानिवृत्त प्राध्यापक मु.जे.महाविद्यालय जळगाव यांनी जागतिकीकरणामुळे आदिवासींच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर झालेला प्रभाव, डॉ. सौ. प्राजक्ता भामरे -स्त्री रोग तज्ञ, भामरे हॉस्पिटल चोपडा यांनी आदिवासींच्या आरोग्य विषयक समस्या व उपायोजना इत्यादी विषयांवर वरील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ईश्वर सौदाणकर व प्रमुख अतिथी प्रा.के.के.वळवी, प्रा. डॉ. जयेश पाडवी, प्रा. अमित गावित, प्रा. सुनील खर्डे यांच्या उपस्थितीत सहभागी विद्यार्थी व शिक्षकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
         या कार्यशाळेच्या माध्यमातून सहभागी आदिवासी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या विकासासाठी चार सत्राच्या माध्यमातून व तज्ञ वक्त्यांच्या माध्यमातून आदिवासींमध्ये होत असलेले धर्मांतरण व त्याची कारणे पार्श्वभूमी व सद्यस्थिती समजण्यास मदत झाली. तसेच आदिवासींच्या विकासासाठी व संरक्षणासाठी असलेल्या संविधानातील तरतुदी हक्क व अधिकार समजले. तसेच जागतिकीकरणामुळे आदिवासींच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर झालेला प्रभाव व त्याची सद्यस्थिती समजली. तसेच आदिवासींच्या आरोग्य विषयक समस्या कोणत्या आहेत व त्यासाठी कोणते उपयोजना अमलात आणल्या पाहिजेत याची माहिती मिळाली. या एकदिवसीय कार्यशाळेमुळे आदिवासींना त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक स्थितीची जाणीव झाली व वास्तविकता कळाली. तसेच या परिस्थितीत आदिवासी समुदायातील लोकांनी स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठीची दिशा कळली.
       सदर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कार्यशाळेचे समन्वयक तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आशिष गुजराथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

जिल्हा रुग्णालयात डायलेसिस उपचारासाठी आरसीएफच्यासीएसआर अंतर्गत आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द !

जिल्हा रुग्णालयात डायलेसिस उपचारासाठी आरसीएफच्या सीएसआर अंतर्गत आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द      रायगड, प्रतिनिधी :राष्ट्रीय के...