Tuesday 23 January 2024

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार याद्या प्रसिध्द !!

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार याद्या प्रसिध्द !!

*मतदार यादीमध्ये 8 हजार 770 मतदारांची निव्वळ वाढ*

रायगड, प्रतिनिधी :- विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर 2023 च्या प्रारुप मतदार यादीत 58 हजार 203 मतदारांची नाव नोंदणी झाली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये 8 हजार 770 मतदारांची निव्वळ वाढ (Net Addition) होऊन एकूण मतदारांची संख्या 23 लाख 16 हजार 515 आहे. मतदार नोंदणी कार्यालयामध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल या संकेतस्थळावर जावून मतदार यादीतील आपले नाव तपासावे तसेच यादी नाव नसलेल्या नागरिकांनी 6 क्रमांकाचा अर्ज भरुन मताधिकारी सुनिश्चित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे.

यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्वाच्या निवडणूका घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यांत आली होती. जिल्ह्यात दि.01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात राबविण्यात आलेल्या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला आहे.

निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण तसेच शुध्दीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी मा.भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवला जातो. दि.27 ऑक्टोबर 2023 रोजी मा. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारुप यादी प्रकाशित करुन 2024 च्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. हा कार्यक्रम दि.27 ऑक्टोबर 2023  ते दि.23 जानेवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आला.

या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर 2023 च्या प्रारुप मतदार यादीत 58 हजार 203 मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच 49 हजार 433 मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये 8 हजार 770 मतदारांची निव्वळ वाढ (Net Addition) होऊन एकूण मतदारांची संख्या 23 लाख 16 हजार 515 इतकी झाली आहे. त्यानुसार 1 हजार 768 पुरुष मतदारांची 6 हजार 965 स्त्री मतदारांची आणि 37 तृतीयपंथी मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायटया यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. 

No comments:

Post a Comment

"येक नंबर" सिनेमाचा मोफत शो; मनसेचे प्रमोद गांधी यांची गुहागर जनतेसाठी आगळीक भेट !!

"येक नंबर" सिनेमाचा मोफत शो; मनसेचे प्रमोद गांधी यांची गुहागर जनतेसाठी आगळीक भेट !! गुहागर : उदय दणदणे दि.१३/१०/२०२४ म...