Tuesday 23 January 2024

शिव स्वराज्य प्रतिष्ठान ( रजि.) संस्थेचा ६ वा वर्धापनदिन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न !

शिव स्वराज्य प्रतिष्ठान ( रजि.) संस्थेचा ६ वा वर्धापनदिन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न !

*** गाव, वाडी मधील मंडळे एकत्रित ठेवणे ह्याहून एक संस्था निर्मित करून टिकवणे अवघड काम असते -  _*विलास सुवरे ( संस्थापक/अध्यक्ष - शिव स्वराज्य प्रतिष्ठान )*_

मुंबई - ( दिपक कारकर )

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उपरोक्त संस्थेचा ६ वा वर्धापनदिन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा - २०२४ रविवार दि.२१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ०९ : ०० वा.नूतन विद्यालय, नगीनदास पाडा, नालासोपारा ( पूर्व ) येथे उत्साहात पार पडला. ह्या सोहळ्याला प्रमुख वक्ते प्रमोद घाडी सर तर प्रमूख पाहुणे ऍड.दिनेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते किशोर भेरे, संगिता ताई भेरे - ( ब.वि.आ.माजी नगरसेविका ), अनंत फिलसे साहेब - ( उद्योजक ), अशोक बाईत, दिपक मांडवकर -( पत्रकार ), शाहीर एकनाथ डिंगणकर, पाडूरंग बाईत, दिलीप रामाणे, विनोद दसवते, अनिल अवेरे, एकनाथ बारस्कर, गणेश वजीरकर, रमेश आगरे, रुग्णसेवक - दिनेश नवरत, तसेच शंकर आंबेकर, मगेश घडवले, अरुण आंबेकर, मनोज पाडावे, अमित भुवड, कृष्णा येद्रे, किशोर दुसार, रोहित नामोळे उपस्थित होते.

प्रतिवर्षी प्रतिष्ठान वर्धापनदिन सोहळ्यात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करत असते. ह्या सोहळ्या प्रसंगी शिव स्वराज्य कला गौरव पुरस्कार- राजेंद्र मोरे, शिव स्वराज्य आदर्श शिक्षक पुरस्कार- विनोद दसवते सर, शिव स्वराज्य दक्ष पत्रकार पुरस्कार - दिपक कारकर, शिव स्वराज्य क्रिडा पुरस्कार- नागेश पानकर, शिव स्वराज्य प्रतिष्ठान मावळा पुरस्कार- महेश पाडावे, शिव स्वराज्य प्रतिष्ठान मावळा पुरस्कार- कु.देवेद्र नवरत

तसेच घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धा - २०२३ उपक्रमातील प्रथम पारितोषिक - शैलेश ठोंबरे 
द्वितीय पारितोषिक- निलेश गावणंग 
तृतीय पारितोषिक - प्रतिक गावडे आदींना सन्मानपत्र, शाल, पुष्गुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. मान्यवरांनी मनोगतात संस्थेच्या अल्पावधीत असणाऱ्या उत्कृष्ट कार्याचे मनभरून कौतुक केले. ह्या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

"येक नंबर" सिनेमाचा मोफत शो; मनसेचे प्रमोद गांधी यांची गुहागर जनतेसाठी आगळीक भेट !!

"येक नंबर" सिनेमाचा मोफत शो; मनसेचे प्रमोद गांधी यांची गुहागर जनतेसाठी आगळीक भेट !! गुहागर : उदय दणदणे दि.१३/१०/२०२४ म...