Tuesday 23 January 2024

शंभर वर्षांची सामाजिक परंपरा लाभलेल्या कुणबी समाजोन्नती संघ मुंबईच्या विभागीय शाखा चेंबूर - ट्रॉम्बेचा २७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा !

शंभर वर्षांची  सामाजिक परंपरा लाभलेल्या  कुणबी समाजोन्नती संघ मुंबईच्या  विभागीय शाखा चेंबूर - ट्रॉम्बेचा २७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा !

मुंबई, (प्रतिनिधी) निलेश कोकमकर :

          कुणबी समाजासाठी गेले १०३ वर्षापासून झटणारी आणि सामाजिक परंपरा जपणारी एकमेव संस्था म्हणजेच कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ही मातृसंस्था शतक महोत्सवी वर्ष साजरा करत असतानाच या संस्थेची विभागीय शाखा चेंबूर- ट्रॉम्बेने आपला २७ वा वर्धापन दिवस सोहळा साजरा केला. यानिमित्ताने रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी शाखेमध्ये सकाळी श्री. सत्यनारायण महापूजा व सायंकाळी महिलांसाठी खास हळदीकुंकू समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि  सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांसाठी होम मिनिस्टर लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. 

सायंकाळी ४ ते ६ या वेळेत भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी ठीक ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.  यामध्ये सर्वप्रथम कुणबी समाजोन्नती संघ विभागीय शाखा चेंबूर -ट्रॉम्बे संलग्न महिला मंडळ वयोगट ५० ते ६० वर्षांमधील महिलांनी "मी मराठी" हे महाराष्ट्राचे यशोगाथा सांगणाऱ्या गाण्यावरती छान  नृत्य सादर केले. त्या नृत्याला उपस्थित प्रेक्षक वर्गातून  वन्स मोर म्हणून खूप चांगला प्रतिसाद मिळाल्यावर वयोगट २५ ते ३६ वर्षांमधील महिलांनी मंगळागौर नृत्य सादर केले. तसेच शाखेच्या  बालवाडीमध्ये शिकणाऱ्या छोट्या बालकलाकारांनी व मुलांनी एक छानसं नृत्य सादर केले. यानंतर महिलांसाठी हळदीकुंकूचा कार्यक्रम झाला. अशा प्रकारे हा वर्धापन  दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. या वर्धापन  दिनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना खासदार माननीय श्री राहुल शेवाळे,  नगरसेवक श्री. अनिल पाटणकर, नगरसेवक श्री. महादेव शिवगण,  शिवसेना विभागप्रमुख श्री. अविनाश राणे,  उद्योगपती श्री. आशिष गडकरी व संघ सहचिटणीस श्री. भास्कर चव्हाण उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा अध्यक्ष श्री प्रभाकर नागरेकर, उपाध्यक्ष श्री दत्ता मोसमकर, श्री शांताराम जाधव, श्री शिवाजी भोवड, श्री. केशव निनावे, खजिनदार श्री. बाळकृष्ण दैत, सचिव श्री. सुभाष घडशी,  सहसचिव श्री. गोविंद बावकर, श्री. सूर्यकांत खुर्दड, श्री. सुनील कदम, कु. स्नेहल शिवगण, श्री. देवजी बोटेकर तसेच विवाह मंडळ अध्यक्ष श्री. गोविंद पुजारे, सचिव श्री. दत्ताराम  शिवगण, सल्लागार श्रीमती. रेखाताई गीते, युवक मंडळ अध्यक्ष श्री जगदीश गोंडाळ, सचिव श्री. प्रकाश शिवगण, महिला मंडळ अध्यक्ष डॉ. सौ. रुचिता बोलाडे,  सचिव सौ. दीप्ती शिवगण व सर्व महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोलाचे  सहकार्य करून हा सोहळा संपन्न केला. प्रमुख पाहुण्यांनी या कार्यक्रमाचे अगदी चांगल्या प्रमाणे भरभरून कौतुक करत कुणबी समाजाला व कुणबी समाजोन्नती संघ विभागीय शाखा चेंबूर  ट्रॉम्बेला आमचे नेहमी सहकार्य राहील अशा शुभेच्छा दिल्या. अशा या शानदार सोहळ्याचे सूत्रसंचालन शाखेच्या महिला अध्यक्ष डॉ. सौ.  रुचिता बोलाडे यांनी आपल्या ओघवत्या वाणीने करून कार्यक्रम अतिशय सुंदर रित्या रंगत आणून सादर केला. तसेच या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांसाठी होम मिनिस्टर लकी ड्रॉ होते त्यासाठी विजेत्यांना पैठणी   देण्यात येणार होती. या कार्यक्रमास घाटला मधील हजारो महिला उपस्थित होत्या. या होम मिनिस्टर लकी ड्रॉच्या ४ भाग्यवान विजेत्या महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पैठणी देण्यात आली. या साठी सर्वच पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेऊन २७ वा वर्धापन दिवस साजरा करून पुन्हा एकदा सर्व आयोजक, सहकारी आणि उपस्थित जनतेचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

"येक नंबर" सिनेमाचा मोफत शो; मनसेचे प्रमोद गांधी यांची गुहागर जनतेसाठी आगळीक भेट !!

"येक नंबर" सिनेमाचा मोफत शो; मनसेचे प्रमोद गांधी यांची गुहागर जनतेसाठी आगळीक भेट !! गुहागर : उदय दणदणे दि.१३/१०/२०२४ म...