Wednesday 3 January 2024

मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे, हिच सावित्रीबाईंना आदरांजली - प्रदिप वाघ

मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे, हिच सावित्रीबाईंना आदरांजली - प्रदिप वाघ

जव्हार-जितेंद्र मोरघा

आज वाकडपाडा जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंचायत समितीचे उपसभापती तथा शालेय शिक्षण समिती चे अध्यक्ष श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की सावित्रीबाई फुले यांच्या मुळे आज मुलींना शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे आज मुलींनी उच्च शिक्षण घेण्यासाठी कटीबद्ध होऊन संकल्प करुया कि गोर गरीब आदिवासी समाजातील मुली देखील सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन मुलींनी तहसिलदार, जिल्हाधिकारी, डॉक्टर, वकील, इंजिनीयर असे उच्च शिक्षण घ्यावे, मुलींनाही शिक्षणा बरोबर कला, क्रिडा क्षेत्रात देखील चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा देखील वाघ यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना नंदकुमार वाघ उपसरपंच यांनी सांगितले की मुलींनी न घाबरता पुढे यावे, पोलिस पाटील विठ्ठल गोडे यांनी सांगितले की आपण सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या प्रमाणे आपण आदर्श घ्यावा.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी कु इशीक गवारी हि होती तिने देखील सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषण करताना सांगितले की आपण सावित्रीच्या लेकी आहोत याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे.

या कार्यक्रमासाठी प्रदीप वाघ उपसभापती, उपसरपंच नंदकुमार वाघ, पोलिस पाटील विठ्ठल गोडे, मुख्याध्यापक सुहास दिनकर, शतानंद भेरे, कुंदन चौधरी, ग्रामपंचायत सदस्य हर्षदा खादे, वेणुताई वाघ, पुजा वाघ, नियती पिठोले इत्यादी महिला व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

डोंबिवलीत शिंदे गटाला मोठा धक्का ; युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांचा ठाकरे गटात प्रवेश !!

डोंबिवलीत शिंदे गटाला मोठा धक्का ; युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांचा ठाकरे गटात प्रवेश !! डोंबिवली, प्रतिनिधी : श्रीकांत शिंदे ...