Monday 15 January 2024

ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने राबविलेल्या योजनेतून देण्यात आलेले साहित्य निकृष्ठ दर्जाचे, लाभार्थी करणार तक्रार ?

ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने राबविलेल्या योजनेतून देण्यात आलेले साहित्य निकृष्ठ दर्जाचे, लाभार्थी करणार तक्रार ?

कल्याण, (संजय कांबळे) : ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगाच्या संस्थांनी व दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे विक्री प्रदर्शन वादात सापडले असताना आता पुन्हा या विभागाने ५ टक्के आणि २० टक्के जि. प सेस फंड फंडातून वाटप केलेले साहित्य हे निकृष्ठ दर्जाचे असून या विरोधात जिल्ह्यातील अनेक लाभार्थी तक्रारी करणार आहेत.

२२ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०२३ या कालावधीत ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात दिव्यांगाच्या संस्था व दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंची विक्री प्रदर्शन भरविण्यात आले होते. याकरिता तब्बल ३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. एकामागून एक अश्या सुट्यांचे दिवस, आणि वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात पणत्या, आकाश कंदील, आदी साहित्य विक्री साठी ठेवण्यात आल्याने या प्रदर्शनाकडे कोणीही ढुंकूनही पाहिले नाही, नामुष्की टाळण्यासाठी प्रदर्शनात सामिल शिक्षकांनी एकमेकांच्या स्टाँल वरील साहित्य खरेदी केले, एकुणच प्रदर्शनाचा ५ दिवसांतील प्रतिसाद पाहता ५ ते ७ लाखाच्या वर खर्च झाला नसावा, अशी परिस्थिती असताना या विभागाने मात्र 'स्वतः व ठेकेदाराच्या,भल्यासाठी तब्बल ३५ लाख रुपयांची तरतूद सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या सेसफंड ५ टक्के अंतर्गत केली आहे.

या भोंगळ कारभारा विरोधात पत्रकार संजय कांबळे यांनी प्रत्यक्षात भेट देऊन, वास्तविकता जाणून घेऊन सचित्र बातम्या प्रसिद्ध केल्या, इतकेच नव्हे तर हा प्रकार महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोध पक्षनेते अंबादास दानवे यांना सांगितला, त्यांनी याची गंभीर दखल घेतली. यामुळे ठाणे जिल्हा परिषदेचे वातावरण भयानक तापले, भ्रष्टाचार झाला आहे, होत आहे याची चौकशी करायची सोडून इतकी गोपनीय माहिती बाहेर कशी गेली? याची चौकशी सुरू झाली. त्यामुळे शिपायांपासून ते सीईओ पर्यंत सर्वच यात बरबटलेले आहेत अश्या संशयाला जागा झाली.

हे सर्व कमी की काय? आता पुन्हा धक्कादायक माहिती समोर येत आहे की, जिप सेस फंडातर्गत ५ टक्के तून दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या तीन चाकी वाहन (स्कुटी) २० टक्के तून इ ५ वी ते ९ वी पर्यतच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सायकली, मागासवर्गीय वस्तीतील समाजमंदिरामध्ये दिलेली भांडी, छतावरील पत्रे, स्टाँल,  संतरजी, डिस्को जँकी (डिजे) मंडप, वाद्यवृंद, आदी साहित्य पुरविण्यात आले होते. परंतु हे निकृष्ठ दर्जाचे असल्याचा आरोप होत असून या विरोधात केंद्र व राज्य सरकारकडे तसेच सामाजिक कार्यकर्ते श्रीमती अंजली दमानिया यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे काही लाभार्थी व कार्यकर्ते यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...