Monday 22 January 2024

आज मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात "नमन" प्रयोग !!

आज मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात "नमन" प्रयोग !!

_"अचाट नगरचा विवाह सोहळा" धम्माल विनोदी लोकनाट्य होणार सादर_

मुंबई - ( दिपक कारकर )

कोकणची लोककला म्हंटल कि सर्वांच्याच मुखातून नमन हे नाव ऐकायला मिळतं आणि मृदूंगाचा नाद कानात दुमदुमू लागतो आणि त्या ठेक्यावर पाय अलगत थिरकायला लागतात.अशीच तुमची-आमची नाळ जोडणारी लोककला अर्थात नमन लोकप्रिय ठरत आहे.

गुहागर तालुक्यातील गेली अनेक वर्षे कला, क्रिडा, सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एस.एस.स्मृती शिगवणवाडी विभाग पिंपळवाडी व जिद्दी क्रिकेट संघ (किरवलेवाडी) आणि दिनेश हरावडे (खेड ) यांच्या सुसज्ज अशा आयोजनात, बळीवंश कलामंच ( रत्नागिरी ) यांचे स्त्री-पात्रानी नटलेले व सतत नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करणारे आणि धावपळीच्या ह्या जीवनात रसिकांच निखळ विनोदाने मनोरंजन करणारे सुप्रसिद्ध नमन आज मंगळवार दि.२३ जानेवारी २०२४ रोजी रात्रौ ठीक ८:३० वा. सुप्रसिद्ध मा.दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले ( पूर्व ) येथे सादर होणार आहे.

मनप्रसन्न करणारा गण पाहण्याजोगा गवळणींचा नृत्यविष्कार आणि पेंद्या वाकड्याची धम्माल सोबतच गेली ३ वर्ष लोकपसंतीस उतरलेलं व हास्यकल्लोळ करणारं तुफान विनोदी लोकनाट्य "अचाटनगरचा विवाह सोहळा" सादर होणार आहे. कार्यक्रमाचे लेखन/दिग्दर्शन शिवश्री सागर बबन डावल यांचे असून, कलामंचातील संपूर्ण टीमची अथक मेहनत आहे. ह्या दैदिप्यमान सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय ( दादा ) आगिवले यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी - संपर्क क्रमांक - ९५६१४७३९६१/८८५०४२२७११ 

No comments:

Post a Comment

"येक नंबर" सिनेमाचा मोफत शो; मनसेचे प्रमोद गांधी यांची गुहागर जनतेसाठी आगळीक भेट !!

"येक नंबर" सिनेमाचा मोफत शो; मनसेचे प्रमोद गांधी यांची गुहागर जनतेसाठी आगळीक भेट !! गुहागर : उदय दणदणे दि.१३/१०/२०२४ म...