Monday, 22 January 2024

स्पर्श फाउंडेशन व कल्पतरू हॉस्पिटलतर्फे ७५ व्या प्रजासत्ताक दिनी आरोग्य शिबिराचे आयोजन !!

स्पर्श फाउंडेशन व कल्पतरू हॉस्पिटलतर्फे ७५ व्या प्रजासत्ताक दिनी आरोग्य शिबिराचे आयोजन !!

कल्याण, प्रतिनिधी :  स्पर्श फाउंडेशन व कल्पतरू हॉस्पिटलतर्फे शुक्रवार, २६ जानेवारी २०२४ रोजी सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणीचे मोफत शिबिर कल्याण येथील कल्पतरू हॉस्पिटल, देसाई कॉम्प्लेक्स, बैलबाजार चौक, कल्याण रेल्वे स्टेशन जवळ, कल्याण (पश्चिम) येथे सकाळी १० ते २ या वेळेत आयोजित केले आहे.

सदर शिबिरात हाडांच्या मॅरो व डेनसिटी टेस्ट (BMD), उंची, वजन व तब्येत यांचा इंडेक्स, अत्याधुनिक मशीन द्वारे डोळ्यांची तपासणी, मेंदू, हाडे, जॉइंट पेन यांची तपासणी, दातांची तपासणी, त्वचा, केस, तपासणी, केसांची टेस्ट, तोंड, छाती, फुफ्फुसे किंवा इतर कॅन्सरच्या टेस्ट, या कॅम्पमध्ये उच्च शिक्षित फिजीशियन, स्त्री तज्ञ, लहान मुलांचे डॉक्टर, डोळे, तसेच इतर स्पेशालिस्ट डॉक्टर उपस्थित असणार आहेत, तेव्हा जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. आश्विन पाटील यांनी केले आहे.

सदर आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याकरिता आपण खालील नंबरवर संपर्क साधून नाव नोंदणी करावी.

संपर्क क्रमांक - 8898988845 / 8356990269

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...