Monday 22 January 2024

लांजा पोलीस ठाण्यावर लांजा तालुक्यातील व गवाणे गावातील ग्रामस्थ आक्रमक !!

लांजा पोलीस ठाण्यावर लांजा तालुक्यातील व गवाणे गावातील ग्रामस्थ आक्रमक !!
               
*काही काळ मुंबई गोवा महामार्ग धरला रोखून*

*कोर्ले फाटा अपघातातील सायकलस्वारचा अखेर मृत्यू*

कोकण (शांताराम गुडेकर)
          लांजा तालुक्यातील गवाणे गावातील समाजसेवक श्री. चंद्रकांत शिवराम करंबळे यांचे चुलत भाऊ कै. उमेश पांडुरंग करंबळे यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी घोषणाबाजी करत शेकडो लांजा तालुक्यातील व गवाणे गावातील ग्रामस्थांनी काल ( दि. २१/१/२४) सकाळी साडेदहा वाजता लांजा पोलीस ठाण्यावर धडकले, त्यानंतर आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी काही काळ मुंबई -गोवा महामार्ग रोखून धरला कै. उमेश करंबळे यांच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा कलम ३०४ गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्याला तात्काळ अटक करा अशी मागणी या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. हा अपघात दिनांक 15/12/2023 रोजी झाला होता. यामध्ये उमेश पांडुरंग करंबेळे जखमी झाले होते. अपघात प्रकरणी गवाणे ग्रामस्थ व कुणबी समाजाच्या शिष्टमंडळाने लांजा नगराध्यक्ष श्री.मनोहर बाईत यांच्या नेतृत्वाखाली लांजा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस निरीक्षक घुटूकडे यांची भेट घेतली होती. दारूच्या नशेत मोटर सायकल भरगाव वेगात चालवून गवाणे गावातील श्री. उमेश पांडुरंग करंबेळे यांच्या अपघाताला जबाबदार असणाऱ्या मोटार सायकल स्वार वसीम युसूफ शेख यांना गुन्हेगार ठरवून यांच्यावर विविध गुन्ह्यातर्गत केस दाखल केली होती.

     दरम्यान अपघातातील उमेश यांचा शुक्रवारी (१९ जानेवारी २०२४) मृत्यू झाला. त्यामुळे शेख या संबंधित व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करतानाच त्याला सोलापूर येथून आणण्यासाठी लांजा पोलिसांचे पथक व काही शिष्टमंडळ त्या ठिकाणी रवाना होईल, अशी ठोस ग्वाही उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.यशवंत केडगे  यांनी संतप्त जमावाला दिली त्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.
            मात्र या अपघाताचा तपास लांजा पोलिसांनी योग्य प्रकारे केला नाही. पोलीसांकडून या प्रकरणात हलगर्जीपणा दाखवण्यात आला असा गंभीर आरोप ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे. पार्श्वभूमीवर अपघातात मृत्यू झालेल्या उमेश करंबेळे याचा मृतदेह मुंबईहून थेट लांजा पोलीस ठाण्यात आणण्यात आला रविवारी दिनांक २१/१/२०२४ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास रुग्णवाहिकेसह शेकडो लांजा तालुक्यातील व गवाणे गावातील ग्रामस्थ लांजा पोलीस ठाण्यावर धडकले. यावेळी लांजा पोलीस ठाण्याचा निषेध असो, उमेश करंबळे यांना न्याय मिळाला पाहिजे व आरोपीला अटक झाली पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी तालुक्यातील व गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. सुरुवातीला या जमावाला आणि रुग्णवाहिकेला पोलिसांकडून प्रवेशद्वारातच रोखण्यात आले. त्यामुळे पोलिस आणि जमाव यांच्या जोरदार वादावादी झाली. त्यानंतर आक्रमक झालेल्या जमावाने थेट मुंबई गोवा महामार्गावर जाऊन बैठक मारत या ठिकाणी महामार्ग रोखून धरला जोपर्यंत रुग्णवाहिका आत नेऊ दिली जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली.

             ग्रामस्थांनी मुंबई -गोवा महामार्गावर ठिय्या मांडत दहा ते पंधरा मिनिटे हा महामार्ग रोखून धरल्याने महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यानंतर गंभीर परिस्थिती पोलिसांनी लक्षात घेऊन अखेर ग्रामस्थ व प्रेत (शव) असलेल्या रुग्णवाहिकेला पोलीस ठाण्यात जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. यशवंत केडगे त्यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा करून त्यांना शेकडो जमावाला काही मार्गदर्शन करण्यासाठी व ठोस ग्वाही देण्यास सांगितले. अश्या प्रकारे त्यांनी आरोपी वसीम युसूप शेख याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा व त्याला अटक करण्याची ग्वाही दिली, अशाप्रकारे श्री.भालचंद्र कांबळे श्री. वसंत घडशी, श्री. समाजसेवक चंद्रकांत करंबळे, आयु सिद्धार्थ कांबळे यांनी सर्व जमावाचे आभार व्यक्त करून कै.उमेश करंबळे यांच्यावर अंत्यविधी करण्यासाठी रवाना झाले.

No comments:

Post a Comment

"येक नंबर" सिनेमाचा मोफत शो; मनसेचे प्रमोद गांधी यांची गुहागर जनतेसाठी आगळीक भेट !!

"येक नंबर" सिनेमाचा मोफत शो; मनसेचे प्रमोद गांधी यांची गुहागर जनतेसाठी आगळीक भेट !! गुहागर : उदय दणदणे दि.१३/१०/२०२४ म...