Sunday 21 January 2024

सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे स्नेहसंमेलन व राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थित संपन्न !!

सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे स्नेहसंमेलन व राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थित संपन्न !!

*पत्रकारिता सेवारत्न पुरस्काराने भिमराव धुळप सन्मानित*

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
                 सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व विशेष व्यक्तीमत्वांचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिमाखदारपणे साजरा झाला.सदर कार्यक्रम माथाडीचे आराध्यदैवत कै. आण्णासाहेब पाटील मैदान, सेक्टर ८ कोपरखैरणे, नवी मुंबई येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी सरवस्ती माता, छत्रपती शिवाजी महाराज, माई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  कार्यक्रमाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ संजीव नाईक, संस्थेचे मार्गदर्शक बाबुराव संकपाळ, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे, जीवनदीप एड्यु मीडियाचे गोरखनाथ पोळ, सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद जोशी, माथाडी कामगार युनियनच्या पदाधिकारी व नगरसेविका ऍड भारती पाटील, माजी नगरसेवक रविंद्र म्हात्रे, संदीप म्हात्रे, लताताई मढवी, सायलीताई शिंदे, शरद पाटील , चंद्रकांत जाधव, दिलिप गुप्ता, ठाणे जिल्हा सिव्हिल डिफेन्सचे सातपुते, कविवर्य व सुलेखनकार शेजाळे यांच्यासह  अनेक  मान्यवर उपस्थित होते.

            संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन मध्ये शाळेतील मुलांनी वेगवेगळ्या गीतावर चांगले नृत्य केली, याला मान्यवरांनी व प्रेक्षकांनी देखील उत्तम साथ दिली. मुलांच्या गुणगौरव सोहळा आणि विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाजातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले. यामध्ये पत्रकारिता सेवारत्न पुरस्कार-धगधगती मुंबई वृत्तपत्राचे संपादक भिमराव धुळप व लोकमतचे नामदेव मोरे यांना तर शिक्षणसेवा रत्न-जगन्नाथ दळवी व सौ निकिता पाटील, गुरुजन गुरुवर्य-रामचंद्र संकपाळ गुरुजी आणि सौ.अलका संकपाळ, शिव व्याख्याते- प्रबोधनकार म्हणून प्रा. रविंद्र पाटील, वाहतुक सुरक्षा जागृती -अमोगसिद्ध पाटील व  शशितलकुमार शिंदे, युवा प्रबोधन - प्रताप महाडीक, द्रोणाचार्य क्रिडा पुरस्कार - सुधीरजी थळे, सामाजिक सेवारत्न-बबनराव संकपाळ, यशस्वी युवा उद्योजिका कुमारी मानसी पोळ यांना सेवाभावी कार्याबद्दल सन्मानपत्र, मायेची शाल व नॅपकिन, बुके देऊन पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष रमेश संकपाळ यांनी प्रास्ताविक व मुख्याध्यापिका सौ दिपाली संकपाळ मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले तर नारायण लांडगे पाटील यांनी सुत्रसंचलन केले. कार्यक्रम यसस्वी करण्यासाठी सचिव अंकुश संकपाळ, सदस्य मारुती सकपाळ, राजेश देसाई, सुभाष संकपाळ, नितीन हिंगे, राजेंद्र मोरे, इथापे सर, शिंदे सर, विठ्ठल तोरणे, रघुनाथ पवार, पांडुरंग संकपाळ, सुभाष कदम, संजय  मोरे इत्यादींनी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

भिवंडी तालुक्यातील कोपर गाव येथील ७ गोदामाना लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान, जीवित हानी टळली !

भिवंडी तालुक्यातील कोपर गाव येथील ७ गोदामाना लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान, जीवित हानी टळली ! भिवंडी, दिं,१२,अरुण पाटील (को...