Sunday 21 January 2024

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जळगाव जिल्हा परिषदेसमोर निषेध आंदोलन !!

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जळगाव जिल्हा परिषदेसमोर निषेध आंदोलन !!
 
नोटीसांची होळी ! सदावरते यांचाही निषेध !!

जळगाव, प्रतिनिधी.. येथील जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाच्या 49 व्या दिवशी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांमदतनीस यांनी महाराष्ट्र सरकारने संपामध्ये तोडगा काढावा. अंगणवाडी सेविकांना कर्मचाऱ्यांना नोटीसा देऊन कामावरून काढून टाकू अशा धमक्या देणे व दडपशाही करण्यापेक्षा त्यांच्या सर्व मागणी मान्य कराव्यात व संप मिटवावा यासाठी व अधिकाऱ्यांनी अंगणवाडी  कर्मचाऱ्यांच्या संपात चालवलेल्या दडप शाहीच्या व नोटिसा देण्याच्या  घाबरवण्याच्या प्रकाराचा निषेध म्हणून जळगाव जिल्हा परिषदेत समोर जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन तर्फे रविवारी सकाळी 12 ते 3 वाजे दरम्यान शांततेत उपोषण करून निषेध करण्यात आला. 

*1) आंदोलनात बहुतेक सेविका मदतनीस काळी साडी परिधान करून निषेधाच्या घोषणा करीत होत्या..
*2) त्यावेळी प्रकल्प कार्यालय मार्फत देण्यात आलेल्या नोटिसांची होळी करण्यात आली..
*3) अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपात कोर्टबाजी घालून घोळ घालण्याच्या एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिकेच्या आंदोलनाच्या ठिकाणी निषेध करण्यात आला..

दरम्यान जिल्हा परिषद बालकल्याण विभागाला जिल्हा कार्यपालन अधिकाऱ्यांच्या नावाने निवेदन देण्यात आले .ते निवेदन कार्यालयाच्या वतीने कक्ष अधिकारी श्री पाटील यांनी स्वीकारले. 

या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे सचिव कॉ. अमृत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष ममता महाजन, मीनाक्षी काठोळे, शोभा नेवे, विजया बोरसे, शहरी प्रकल्पाच्या लता पाटील  मंगला पाटील  विजया बोरसे पुशपावती मोरे यांनी केले.
 

त्यावेळी कॉ. महाजन सविस्तर मार्गदर्शन करताना सांगितले की, आशांच्या संपात महाराष्ट्र शासनाने आश्वासनानुसार परिपत्रकच काढलेले नाही त्यामुळे त्याही 12 तारखेपासून आशा गटप्रवर्तक संघटना कृती समितीमार्फत संपावर आहेत  अंगणवाडी कृती समिती व आशा गटप्रवर्तक कृती समिती यांचे अध्यक्ष कॉ. एम ए पाटील, दिलीप उताणे, शुभ शमीम आदी नेते नेतृत्व करत आहेत, दोन्ही आंदोलनात आयटक सहभागी आहेच त्यामुळे आयटकच्या आशा व गटप्रवर्तक अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संप मध्ये एक दुसऱ्याला पाठिंबा आहे.. दोघांच्याही संप मोडून टाकण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. जळगाव जिल्ह्यात राज्यात ज्या निर्धाराने संप लढत आहोत त्यामुळे यश मिळेल असा आत्मविश्वास व्यक्त केला..  
या आंदोलनात अश्विनी देशमुख, कमलबाई माळी, शारदा पाटील, रमा ईसाने, छाया चित्ते, मंगला पाटील, सखुबाई पाटील, मथुरा पाटील, मनीषा बडगुजर, मीना पाटील, विजय हिवराळे, लक्ष्मी केदार आदि चोपडा जळगाव धरणगाव पाचोरा भडगाव तालुका व शहरातील सेविका मदतनीस उपस्थित होत्या. "रविवार असूनही सेविकांबद्दल चांगल्या संख्येने आल्या होत्या ही विशेष"

No comments:

Post a Comment

भिवंडी तालुक्यातील कोपर गाव येथील ७ गोदामाना लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान, जीवित हानी टळली !

भिवंडी तालुक्यातील कोपर गाव येथील ७ गोदामाना लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान, जीवित हानी टळली ! भिवंडी, दिं,१२,अरुण पाटील (को...