Sunday 21 January 2024

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प ), येथे शालेय व्यवस्थापन व विकास समितीची सभा संपन्न... माजी विद्यार्थ्यांनी घेतला पुढाकार!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प ), येथे  शालेय व्यवस्थापन व विकास समितीची सभा संपन्न... माजी विद्यार्थ्यांनी घेतला पुढाकार!!
मुंबई प्रतिनिधी ता. 22, पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संचालित संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला पश्चिम या रात्र शाळेची शालेय व्यवस्थापन व विकास समितीची दुसरी सभा दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाली. या सभेसाठी संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री बी. डी. काळे सर अध्यक्षस्थानी  होते. 
तसेच रात्र शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री विश्वनाथ राऊत, शिक्षकवर्ग  श्री खैरनार सर, श्री विरकर सर, श्री पद्माकर फर्डे सर, तसेच मासूम संस्थेच्या प्रोजेक्ट मॅनेजर धनश्री धनावडे मॅडम, सामाजिक कार्यकर्ते ब्रिजेस अग्रवाल, विनोद कश्यप व माजी विद्यार्थी जितेंद्र पड्याळ, रुपेश गरड, अजय, राणी, नकोशी, आरती, अनिता शिलवंत इ. सभेसाठी उपस्थित होते.  या सर्वांचे मुख्याध्यापकांच्या हस्ते  गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व सभेला सुरुवात केली.
सभेपुढे पुढील विषय ठेवण्यात आले- 1) सन 2024-25 मधील नवीन विद्यार्थी प्रवेशाबाबत 
2)  विद्यार्थी उपस्थिती बाबत 
3) विद्यार्थी दत्तक योजनेबाबत 4) शैक्षणिक साहित्याबाबत 
5) दानशुर व्यक्तींकडून मदत मिळवणे 
6) रात्र शाळेच्या वर्ग खोल्यांच्या भाडे भरण्याबाबत इत्यादी विषय रात्र शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ राऊत यांनी सभेपुढे मांडले. सभेमध्ये उपस्थित असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. ते म्हणाले की, या रात्र शाळेच्या विद्या मंदिरातून शिकून आज आम्ही स्वतःच्या पायावर उभे आहोत, सभेमध्ये  घेतलेल्या विषयाबाबत आम्ही रात्र शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करणार ! एवढेच नाही तर,  परिसरात राहणारे खासदार, आमदार, नगरसेवक व इतर मदत करणारे दानशूर व्यक्तींना भेटून रात्र शाळेसाठी जी काही मदत मिळवता येईल तीही  मिळवण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असे माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पड्याळ, रुपेश गरड, ब्रिजेश अग्रवाल यांनी मुख्याध्यापकांना सांगितले. तसेच रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक साहित्य मिळवून देणार असेही सभेमध्ये सांगितले गेले. मागील सभेत ठरल्याप्रमणे माजी विद्यार्थी जितेंद्र पाड्याला यांनी फिल्म सिटी रोटरी क्लब मुंबई यांच्याकडून रात्र शाळेस गोदरेजचे  कपाट व एक प्रिंटरही मिळवून दिला होता.
रात्र शाळेचे जे विद्यार्थी गैरहजर असतात त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटी देऊन समजावून  शाळेत घेवून येण्यासाठीचे कार्यही आम्ही करणार असेही माजी विद्यार्थ्यांनी सभेमध्ये सांगितले.
शेवटी रात्र शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री खैरनार सर यांनी सभेमध्ये उपस्थित असणाऱ्यांचे मनापासून आभार मानले व अध्यक्षांच्या वतीने सभा संपन्न  झाली असे जाहीर केले.

No comments:

Post a Comment

भिवंडी तालुक्यातील कोपर गाव येथील ७ गोदामाना लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान, जीवित हानी टळली !

भिवंडी तालुक्यातील कोपर गाव येथील ७ गोदामाना लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान, जीवित हानी टळली ! भिवंडी, दिं,१२,अरुण पाटील (को...