Sunday 13 October 2024

भिवंडी तालुक्यातील कोपर गाव येथील ७ गोदामाना लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान, जीवित हानी टळली !

भिवंडी तालुक्यातील कोपर गाव येथील ७ गोदामाना लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान, जीवित हानी टळली !

भिवंडी, दिं,१२,अरुण पाटील (कोपर) :

भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात आगी लागण्याच्या घटना या वारंवार घडत असून यात काही आगी या विमा (इन्शुरन्स) वसूल करण्यासाठी लावल्या जात असल्याचे बोलले जाते तर काही आगी या दुर्दैवाने लागून लाखोंचे आर्थिक नुकसान होतना दिसत आहे .अश्याच प्रकारे भिवंडी तालुक्यातील कोपर ग्रामपंचायत हद्दीतील श्री अरीहंत कॉर्पोरेशन येथील बिल्डिंग नंबर एच -२, पहिला मजला येथील ७ गोदामांना भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे.या लागलेल्या आगी दरम्यान कामगारांनी योग्यवेळी बाहेर निघाल्याने जीवित हानी टळली आहे. 

ही भीषण आग शनिवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लागली होती.ही आग विझवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते मात्र प्रचंड वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन दलास वेळेवर पोहचता आले नाही. मात्र पोहचले नंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास दलास यश आले .मात्र तो पर्यंत सर्व वस्तू भक्ष्य स्थानी पडल्या होत्या. या ठिकाणी बक्षीस देणाऱ्या "ट्रॉफी "बनवण्याचा कारखाना होता.त्या साठी लागणारे "प्लाय वूड"चा साठा या ठिकाणी करण्यात आला होता. तसेच लगत झुंबर व इलेक्ट्रॉनिक वस्तूनचां साठा देखील होता, तोही जाळून खाक झाला आहे.यदा कदाचित सदर आग ही समोरील बिल्डिंग नं.एच-१ मध्ये पसरली असती तर या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहात असलेल्या रहिवाशांना धोका निर्माण झाला असता. 

सदर आगीची माहिती देताना या ठिकाणी काम करणाऱ्या कामगाराने सांगितले की, काम करत असताना छताच्या पांख्यामधून (सीलिंग फॅन) धूर निघून पंख्याला आग लागली व त्या आगीची टिपके खाली पडले व बाजूलाच "प्लाय वुड " असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. ही आग विजवण्याचा तेथील कामगारांनी प्रयत्न केला होता मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नसल्याने हा गंभीर प्रकार घडला.अश्या घटना घडू नये म्हणून गोदाम चालक --, मालकांनी देखील सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करणे गरजेचे आहे. 

अशा घटना घडू नये म्हणून गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच श्री.हेमंत सूर्यकांत घरत यांनी देखील पुढाकार घेऊन आपल्या हद्दीतील गोदामांमध्ये  कोणत्या मालाची साठवणुक केली आहे , त्यांनी "ना हरकत" दाखला घेतला आहे का नाही? याची प्रत्यक्षात जावून तपासणी करावी, व योग्य असल्यास त्यांना निःशुल्क (फुकट) देऊन त्यांना सुरक्षतेविषयी योग्य मार्गदर्शन करावे, नाहीतर काही ग्रामपंचायत कार्यालयाकडून आर्थिक व्यवहार केला जात असल्याचे बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment

भिवंडी तालुक्यातील कोपर गाव येथील ७ गोदामाना लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान, जीवित हानी टळली !

भिवंडी तालुक्यातील कोपर गाव येथील ७ गोदामाना लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान, जीवित हानी टळली ! भिवंडी, दिं,१२,अरुण पाटील (को...