Friday, 11 October 2024

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !!

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी  येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !!

चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार प्रशांत यादव यांना स्थानिक ग्रामस्थांचा जाहीर पाठींबा 

मुंबई (शांताराम गुडेकर) :
          रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील वांझोळे गवळीवाडी जुगाई देवी मंदिर सभामंडपाचे व  सुशोभीकरणाचे भूमिपूजन समारंभ काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन मान.प्रशांत यादव यांच्या आदेशाने निशिकांत भोजने व पश्चिम विभाग गवळी समाज मंडळाचे अध्यक्ष अनंत भालेकर यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले.कारण यादव साहेब यांचे नियोजित विविध कार्यक्रम आणि महत्वाचं काम मुंबई मध्ये असल्यामुळे ते तातडीने मुंबईला जाण्यासाठी निघाले.आश्वासनपूर्ती केल्याबद्दल ग्रामस्थांनी यानिमित्ताने यादव आणि संपूर्ण कार्यकारणी यांना धन्यवाद देत चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार प्रशांत यादव यांना जाहीर पाठींबा असल्याचे जाहीर केले.यावेळी अनेक मान्यवरांसह स्थानिक ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          वांझोळे गवळीवाडी (ता.संगमेश्वर) जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी येथील जुगाई देवी मंदिर  व  सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन समारंभाला मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड संदीप गायकर, अनंत खेडेकर, गणपत पंदेरे, सिताराम खेडेकर, प्रकाश भोजने, शिवराम वाजे, राजेश पवार, मुरलीधर चौगुले, ऍड.राकेश चाचे, महेश महाडिक, राजू पवार, सुरेश गोपाळ, अविनाश गोपाळ, महेंद्र बडद आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रशांत यादव आणि इतर मान्यवरांचा ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी यादव साहेब, आम्ही शंभर टक्के तुमच्या पाठीशी आहोत असं आश्वासन दिले. आई जुगाई देवी मंदिराच्या सभोवताली सुशोभीकरण काम आपण लवकरच मार्गी लावू असे आश्वासन प्रशांत यादव यांनी गणेशोत्सवाच्या भेटीदरम्यान ग्रामस्थांना दिले होते. या आश्वासनाची आज खऱ्या अर्थाने पूर्ती झाली. यादव यांनी आपले वचन पाळले. त्यामुळे आता वचन द्यायची वेळ आमची आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही शंभर टक्के आपल्यासोबत राहू असे ग्रामस्थांच्या वतीने यनिमित्ताने सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

कल्याण पूर्व व श्री मलंग विभागात अखंड वीजपुरवठ्यासाठी MSEDCL अधिकाऱ्यांसोबत बैठक; स्विचिंग स्टेशन व RDSS प्रकल्पांवर चर्चा !!

कल्याण पूर्व व श्री मलंग विभागात अखंड वीजपुरवठ्यासाठी MSEDCL अधिकाऱ्यांसोबत बैठक; स्विचिंग स्टेशन व RDSS प्रकल्पांवर चर्चा !! *क...