Friday, 11 October 2024

ॲटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी धारकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना !!

ॲटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी धारकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना !!

मुंबई, प्रतिनिधी  : राज्यातील ॲटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी धारकांसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ॲटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक’ कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ॲटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालकांनी मंडळाकडे नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे करण्यात आले आहे.

एका कुटूंबातील एकूण चार व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराकडे अनुज्ञप्ती व बॅज असणे आवश्यक राहील. योजनेचा निधी संकलन मंडळाच्या कार्यालयात केवळ डिजीटल, ऑनलाईन पद्धतीने केले जातील. कोणत्याही परिस्थितीमध्ये रोखीने निधी संकलन केले जाणार नाही. योजनेसंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधावा. याठिकाणी अर्ज निशुल्क वितरीत करण्यात येत असून तात्पुरत्या स्वरुपात अर्जही स्विकारले जात आहेत, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे च्या दणक्याने जे एम बक्षी पोर्ट नमले - गुजरातला काढलेली जाहिरात रद्द !!

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे च्या दणक्याने जे एम बक्षी पोर्ट नमले - गुजरातला काढलेली जाहिरात रद्द !! *** नोकर भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधा...