Friday, 19 January 2024

श्री सद्गुरु संत बाळूमामा सार्वजनिक उत्सव मुंबईतर्फे घाटकोपर येथे विविध कार्यक्रम संपन्न !!

श्री सद्गुरु संत बाळूमामा सार्वजनिक उत्सव मुंबईतर्फे घाटकोपर येथे विविध कार्यक्रम संपन्न !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

              श्री सद्गुरु संत बाळूमामा सार्वजनिक उत्सव मुंबईतर्फे कतोडी पाडा, भटवाडी, बर्वे नगर, घाटकोपर (प.) येथे संत बाळूमामा यांचा भंडारा निमित्त अन्न दान व धार्मिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये मोफत चष्मे वाटप शिबिर,रक्तदान शिबिर, भंडारा, महिला हळदी कुंकू कार्यक्रम, 
मराठमोळी पैठणी वाटप, मोफत चेकअप शिबिर, ह.भ.प.श्री पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा) किर्तन सेवा कार्यक्रमांचा समावेश होता. नागरिकांनी या संपूर्ण कार्यक्रमला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.करमाळा तालुक्याचे आमदार श्री.आबा सरक, आमदार श्री. राम कदम, धनगर समाजाचे नेते माजी मंत्री श्री. महादेव जानकर, मनसे मा. शाखा अध्यक्ष श्री. शरद भावे, श्री सद्गुरु संत बाळूमामा सार्वजनिक उत्सव मुंबई अध्यक्ष- संजय घाडगे, सेक्रेटरी -रामचंद्र नायकुडे, खजिनदार -रविंद्र पालवे, उपाध्यक्ष- सदाशिव सलगर, उप सेक्रेटरी -देविदास वाघमोडे, उप खजिनदार- बाळासाहेब हंडाळ, कार्याध्यक्ष- धनाजी ठोंबरे आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

No comments:

Post a Comment

गव्हाणफाट्याचा राडारोडा विंधणे जवळ फेकणार ; आसामच्या ठेकेदाराला कंत्राट; सिडकोचा प्रताप !!

गव्हाणफाट्याचा राडारोडा विंधणे जवळ फेकणार ; आसामच्या ठेकेदाराला कंत्राट; सिडकोचा प्रताप !! सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी केलेल्या म...