Friday 19 January 2024

मोठी स्वप्न पहा, आपली स्वप्न हा माझा संकल्प - *मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी*

मोठी स्वप्न पहा, आपली स्वप्न हा माझा संकल्प - *मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी*

कल्याण , नारायण सुरोशी : मोठी स्वप्न पहा, आपली स्वप्न हा माझा संकल्प ! असे प्रतिपादन पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी आज केले. अमृत 2.0 योजनेअंतर्गत मोहिली येथील 275 द.ल.लि क्षमतेच्या उदंचन केंद्राचा ऑनलाईन भुमिपूजन समारोह मा.नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, त्यावेळी बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले. शासनाच्या योजनांचा लाभार्थ्यांनी शिघ्रतेने लाभ घ्यावा , असे भावनिक आवाहन करीत आपल्या प्रभावशाली भाषणाने मा.नरेंद्रजी मोदी यांनी उपस्थित समुदायाला मंत्रमुग्ध केले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल मा. रमेश बैस, मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री मा. अजित पवार तसेच इतर मान्यवर कार्यक्रम स्थळी व्यासपीठावर प्रत्यक्ष उपस्थित होते.
 

केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानाअंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील पाणी पुरवठा प्रकल्पाची, मोहिली येथे 275 द.ल.लि. क्षमतेचे उदंचन केंद्र बांधणे (रु.77.58 कोटी), कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात नविन 10 जलकुंभ बांधणे (रु. 48.45 कोटी), कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नव्याने विकसीत भागात वितरणव्यवस्था टाकणे (24.47 कोटी), गौरीपाडा येथे 95 द.ल.लि. क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र बांधणे (रु.152.62 कोटी) ही कामे मंजूर आहेत. या रु.303.12 कोटीच्या मंजूर कामांमुळे महानगरपालिका क्षेत्रातील सद्यस्थितीतील सुमारे 22 लक्ष लोकसंख्येला तसेच झपाटयाने विकसीत होत असलेल्या भागाला सुरळीत व शुध्द पाणी पुरवठा होणार आहे. मोहने उदंचन केंद्र हे सुमारे 40 ते 45 वर्षे जुने असून या नविन उदंचन केंद्रामुळे, मोहने उदंचन केंद्राच्या देखभाल दुरुस्ती व जलशुध्दीकरण केंद्रातील शुध्दीकरणावर होत असलेल्या खर्चात वार्षिक रुपये 0.75 ते 1.00 कोटी इतकी बचत होणार आहे.

कल्याण पश्चिम येथील अत्रे रंगमंदिरात दुरदृश्यप्रणालीव्दारे संपन्न झालेल्या या भुमीपूजन समारोहाच्या कार्यक्रमास मा.आमदार गणपत गायकवाड, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, इतर अधिकारी/कर्मचारी, माजी लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

1 comment:

  1. मोठी स्वप्न कर्ज काढुन पुर्ण करु नका

    ReplyDelete

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !!

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी  येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !! चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघ...