Friday 19 January 2024

सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) आयोजित १६ वा वर्धापनदिन सोहळा व कुणबी समाज महामेळावा थाटामाटात संपन्न !!

सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) आयोजित १६ वा वर्धापनदिन सोहळा व कुणबी समाज महामेळावा थाटामाटात संपन्न !!

पुणे (दिपक फणसळकर /वेदिका आलिम)
                सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) आयोजित १६ वा वर्धापनदिन सोहळा व कुणबी समाज महामेळावा आण्णा भाऊ साठे सभागृह,पद्मावती, पुणे, या ठिकाणी हजारो बंधू-भगीनींच्या उपस्थितीत नुकताच दिमाखात संपन्न झाला.अन्याया विरूध्द वाचा फोडणारी संघटना म्हणजे सहयाद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) ही संघटना गेली पंधरा वर्षे सातत्याने समाजकार्यात आपला ठसा उमटवत आहे, या संघटनेचा १६ वा वर्धापनदिन सोहळा आणि कुणबी समाज महामेळावा अत्यंत सुंदर अशा नियोजनातुन संपन्न झाला. कोकणची कला जोपासणारे श्री स्वामी समर्थ नमन मंडळ पुणे यांचे उत्कृष्ट अशा नमनाचे  सादरीकरण केले गेले.          
                
                कार्यक्रमाची सुरुवात आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दिपप्रज्वलनाने तसेच कु. ज्ञानी भागणे हिच्या  शिवगर्जनेने करण्यात आली. कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे रवींद्रजी धंगेकर (आमदार कसबा मतदार संघ पुणे), अजितजी यशवंतराव -(संचालक-रत्नागिरी जि.मध्यवर्ती सहकारी बँक.), विजयजी उर्फ बापूसाहेब  डाकले- अध्यक्ष- आद्यक्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक स.महाराष्ट्र शासन, डॉ.संदीपजी बुटाला सर, किरणजी दगडे पाटील- नगरसेवक म.न.पा.,सचिनजी तावरे- राष्ट्रवादी नेते पर्वती, प्रकाशजी यादव, विकासजी लांबोरे, वासुदेवजी साळवी, चंद्रकांतजी भुवड, मधुकरजी ठीक,  विजयजी धामणे, उमेशजी टेमकर, योगेशजी निंबरे, सत्यजितजी हिरवे, तसेच प्रत्येक तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील आदी प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. सहयाद्री कुणबी संघ महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी गणपत दादा घडशी- कार्याध्यक्ष विलास दादा घडशी- अध्यक्ष महाराष्ट्र प्रांत, प्रविण भोज, दिपक फणसळकर, विठ्ठल नाईक उपाध्यक्ष महा.प्रांत. सतीश डाकवे- अध्यक्ष पुणे शहर, नितिन शिगवण- अध्यक्ष पुणे जिल्हा, अंकिता शिगवण- महिलाध्यक्षा पुणे शहर, कार्याध्यक्षा-वैष्णवी भोज ,सरचिटणीस वर्षा घडशी, वेदिका आलीम- उपाध्यक्षा मुंबई शहर, महाराष्ट्र प्रांत कोअर कमिटी पदाधिकारी, युवा नेते सचिन घडशी, माजी अध्यक्ष एकनाथ मांडवकर पुणे शहर सर्व विभाग अध्यक्ष, पदाधिकारी तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी सर्व कार्यकर्त्या उपस्थित होते. संघाचे हितचिंतक मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सन्माननीय आमदार सिद्धार्थ शिरोळे, मा.उपमहापौर दीपक भाऊ मानकर, शुक्राचार्य भाऊ वांजळे उपाध्यक्ष पुणे जिल्हा परिषद आदी हितचिंतक यांचेही  मनापासून धन्यवाद देण्यात आले. २०२४ चा सहयाद्री रत्न पुरस्कार- राजेंद्र भुवड यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष रामाणे, सूत्रसंचालन वैभव मुरकुटे स्वीक्रुत सदस्य पुणे म.न.पा, आणि आभार प्रदर्शन छगन (राज) भागणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी जवळपास एक हजार तीनशे लोकांचा जनसमुदाय शेवट पर्यंत कार्यक्रम पाहत होते, आमच्या कोकणातील कोकण कला सादर करून सर्वांना आपली कला आविष्कार सादर करून स्थिरावन्याचे काम केले. ते थोडक्या कालावधीतच नावाजलेले सुप्रसिद्ध पुण्यातील नमन स्वामी समर्थ नमन मंडळ. मग ढोलकी वादक, गायक,कला सादरीकरण करणारे नाट्य... शेवटपर्यंत आपली नयनरम्य कला सादरीकरण करून लोकांना आपल्या कलेने मंत्रमुग्ध करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !!

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी  येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !! चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघ...