Friday 19 January 2024

सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) संस्थेचा १६ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न !

सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) संस्थेचा १६ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न !

मुंबई - ( दिपक कारकर )

पुणे शहरातील सहयाद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) ही संघटना गेली पंधरा वर्षे सातत्याने समाजकार्यात आपला ठसा उमटवत आहे. उपरोक्त संघटनेचा १६ वा वर्धापनदिन सोहळा आणि कुणबी समाज महामेळावा अत्यंत सुंदर अशा नियोजनात रविवार दि.१४ जानेवारी २०२४ रोजी पुण्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, पद्मावती ( पुणे ) येथे संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दिपप्रज्वलनाने तसेच शिवकन्या ज्ञानी छगन भागणे या ६ वर्षाच्या मुलीच्या शिवगर्जनेने करण्यात आली.

या अभूतपूर्व कार्यक्रम स्थळी प्रमुख पाहुणे रवींद्रजी धंगेकर (आमदार कसबा मतदार संघ पुणे), अजितजी यशवंतराव -(संचालक -रत्नागिरी जि.मध्यवर्ती सहकारी बँक.), विजयजी उर्फ बापूजी डाकले-अध्यक्ष- आद्यक्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक स. महाराष्ट्र शासन, डॉ. बुटाला सर, किरणजी दगडे पाटील-नगरसेवक म.न.पा., सुरजजी लोखंडे- लोकसेवक पर्वती, सचिनजी तावरे- राष्ट्रवादी नेते पर्वती, प्रकाशजी यादव-अध्यक्ष- स्वराज्य कोकण संस्था महाराष्ट्र राज्य, विकासजी लांबोरे- शाहीर लांजा तालुका, वासुदेवजी साळवी- अध्यक्ष-मु.तळघर- दंडवाडी मुंबई मंडळ, चंद्रकांतजी भुवड-युवा उद्योजक मुंबई, मधुकरजी ठीक- सामाजिक कार्यकर्ते, विजयजी धामणे-सामाजिक कार्यकर्ते, उमेशजी धामणे-सामाजिक कार्यकर्ते, उदयजी साळवी-सामाजिक कार्यकर्ते, उमेशजी टेमकर-अध्यक्ष-मु.कात्रण भेलांडेवाडी, मुंबई मंडळ, योगेशजी निंबरे-कोथरूड शाखा अध्यक्ष शिवसेना, सत्यजितजी हिरवे- आर.पी.उपाध्यक्ष, तसेच प्रत्येक तालुक्यातील सरपंच,पोलीस पाटील, प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते, सहयाद्री कुणबी संघ महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी गणपत दादा घडशी-कार्याध्यक्ष, विलास दादा घडशी- अध्यक्ष महाराष्ट्र प्रांत, सतीश डाकवे- अध्यक्ष पुणे शहर, अंकिता शिगवण-महिलाध्यक्षा पुणे शहर, नितिन शिगवण- अध्यक्ष पुणे जिल्हा. तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी,महिला आघाडी उपस्थित होते.

उपस्थितांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. दरम्यान ह्या वर्षीचा "सहयाद्री रत्न पुरस्कार - २०२४" सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भुवड यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष रामाणे, सूत्रसंचालन वैभव मुरकुटे तर आभार प्रदर्शन छगन (राज) भागणे यांनी केले. ह्या स्तुत्य उपक्रमाचे व तरुणाईचे उत्तम संघटन निर्माण होऊन, सामाजिक चळवळीत सातत्याने कार्य करणाऱ्या सह्याद्री कुणबी संघ, पुणे शहर संस्थेचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !!

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी  येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !! चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघ...