Thursday 18 January 2024

कुमारी एकता विकास राजगुरूची वन विभाग नाशिक येथे लेखापाल म्हणून नियुक्ती !!

कुमारी एकता विकास राजगुरूची वन विभाग नाशिक येथे लेखापाल म्हणून नियुक्ती !!

कल्याण, संदीप शेंडगे : गेल्या पंधरा वर्षापासून बंद असलेल्या एनआरसी कामगाराची मुलगी वन विभाग नाशिक येथे लेखापाल या पदावर निवड झाल्याने या मुलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
      विकास राजगुरू यांची मुलगी एकताने अथक परिश्रम करून आपल्या मेहनतीच्या जोरावर नाशिक येथे झालेल्या लेखापाल पदाच्या परीक्षेत उज्वल यश संपादन करून लेखापाल हे पद मिळविले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात वन विभागात १२३ जागांकरिता  भर्ती होणार होती याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून ८१००० अर्ज आले होते.

        यापैकी नाशिक वन विभागात केवळ नऊ जागा होत्या या नऊ जागांपैकी एक जागा शेड्युल कास्ट साठी राखीव होती. ९ पदांच्या भर्ती करीता नाशिक विभागामधून ६००० अर्ज आले होते. ६००० उमेदवारांमधून कुमारी एकता विकास राजगुरू घवघवित यश संपादन करून ती एकमेव जागा पटकावली.
        आईचे वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून पदवी संपादन झाल्यानंतर एकताने स्पर्धा परीक्षांकडे आपले लक्ष केंद्रीत केले होते. स्पर्धा परीक्षांमधून आपण मोठ्या पदाची नोकरी मिळवू शकतो हा विश्वास असल्याने आई-वडिलांनी तिला स्पर्धा परीक्षांची पुस्तके व अभ्यास करण्याकरिता भरपूर वाव व प्रोत्साहन दिले.

         आई-वडिलांचे आशीर्वाद आणि  प्रोत्साहनामुळेच मी आज या पदावर पोहोचले असून यापुढे नोकरी करून क्लास वन पदाच्या नोकऱ्यांकरिता आपण स्पर्धापरीक्षा देत राहणार असे सांगितले. एकताच्या यशाने संपूर्ण बौद्ध समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून एकताचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !!

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी  येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !! चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघ...