Thursday 18 January 2024

नालासोपारात शिवसेनेत महिलांचे जोरदार इनकमिंग..!

नालासोपारात शिवसेनेत महिलांचे जोरदार इनकमिंग..!

नालासोपारा, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन व शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांच्या नेतृत्वात नालासोपारातील महिलांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग ही सुरु झाले असुन राजकारणातील घडामोडींनी आता वेग घेतला आहे. शिवसेना पक्षाने  पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आपली बांधणी सुरु केली आहे.

महिला आघाडी शहर संघटक सौ. रूचिता अमित नाईक यांच्या हस्ते महिलांचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा  नियुक्ती पत्र देऊन पार पाडण्यात आला. यावेळी महिला आघाडी उपशहर संघटक पदी सौ.स्मिता वैद्य व महिला उपशाखा प्रमुख पदी सुषमा शहासने यांची  नियुक्ती करण्यात आली.

शिवसेना महिला आघाडी संघटन मजबूत झाल्यास तळागाळातील महिलांचे प्रश्न सोडवता येईल एक महिला कुटूंब सांभाळुन प्रत्येक क्षेत्रात यशस्वी झेप घेऊ शकते म्हणुन महिलांनी स्वतःचा आत्मविश्वास वाढवून राजकारणात यावे व निवडणुकीत सहभागी होऊन येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नालासोपारात महिला आघाडी भगवा फडकवु असा विश्वास महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांनी व्यक्त केला.

यावेळी शहरप्रमुख आनंद नगरकर, उपशहरप्रमुख महेश निकम, महिला आघाडी उपशहर संघटक आशा सातपुते व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दसऱ्याचे अध्यात्मिक महत्व- संत राजिन्दर सिंह जी महाराज

दसऱ्याचे अध्यात्मिक महत्व -  संत राजिन्दर सिंह जी महाराज आपण सर्व हे जाणतो की, दर वर्षी आपण दसरा हा सण साजरा करतो. हा सण असत्याव...