Thursday 18 January 2024

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर 
प्रेस नोट 

म्हारळ गावातील बांधकाम व्यावसायिक संदीप गायकवाड 


तक्रारदार श्री. संदीप पंडीत गायकवाड उर्फ पप्पु, व्यवसाय बिल्डर, रा. म्हारळ सोसायटी, समर्थ कृपा अपार्टमेट ता. कल्याण जि. ठाणे हे व्यवसायाने बांधकाम व्यवसायीक असुन उल्हासनगर शहरामध्ये बांधकामाची कामे करीत असतात. त्यांचे सध्या हार्दिक ज्वेलर्सचे पाठीमागे, सावंत चाळीच्या बाजुला, शिव रोड, उल्हासनगर नंबर 1 येथे सुरू असलेल्या बांधकामावर तोडक कारवाई करण्यात यावी याबाबत इसम नामे शांताराम शेळके यांने उल्हासनगर महानगरपालिकेत तक्रारी  अर्ज करून सदर तक्रारी अर्ज मागे घेण्यासाठी 50,000/- रूपयाची खंडणीची रक्कम मागणी केलेबाबत  मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर कार्यालयात दिनांक 15/01/2024 रोजी तक्रार अर्ज केला होता. सदर तक्रारी अर्जाचे अनुषंगाने मा. वरिष्ठांनी कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते. 
त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर कडून सापळा कारवाई करण्यात येवुन तक्रारदार संदिप गायकवाड यांचेकडून 50,000/- रूपये खंडणीची रक्कम स्विकारतांना  आरोपी नामे शांताराम जानु शेळके वय 48 वर्षे ध्ंादा कारपेंटर, रा. शेळके निवास, माने चाळ, 23/26 मराठी शाळेजवळ, विर तानाजीनगर, उल्हासनगर नं. 1, जि ठाणे. ( वार्ड अध्यक्ष भारतीय कामगार कर्मचारी महासंघ प्रणित असंघटीत कामगार महासंघ ) यास दिनांक 16/01/2024 रोजी 18ः25 वा रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याचे विरोधात तक्रारदार संदिप गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. 49/2024 भा.दं.वि. कलम 384, 386, 506 (2)  प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून नमुद गुन्हयात आरोपी शांताराम शेळके यास अटक करण्यात आली असून त्याची दिनांक 20/01/2024 रोजीपावेतो पोलीस कोठडी रिमांड मिळविण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि/सुनिल तारमळे हे करीत आहेत. 
सदरची कारवाई मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे शहरचे वपोनि/शेखर बागडे, सपोनि/सुनिल तारमळे, सपोनि/भुषण कापडणीस, सपोउनि/संजय बाबर, पोहवा/गणेश गुरसाळी, पोहवा/संजय राठोड, मपोहवा/शितल पावसकर, मपोशि/मयुरी भोसले, चापोना/भगवान हिवरे यांनी केली आहे. 

सविनय सादर,

( शेखर बागडे )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
खंडणी विरोधी पथक, 
गुन्हे शाखा, ठाणे शहर

No comments:

Post a Comment

माजी नगरसेवक शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेरील शेडवर कारवाई झाल्याने सर्वसामान्य शिवसैनिक संतप्त !!

माजी नगरसेवक शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेरील शेडवर कारवाई झाल्याने सर्वसामान्य शिवसैनिक संतप्त !! झालेली कारवाई सूडबुद्धीने - माजी नगरसेवक व...