Wednesday 17 January 2024

आमदार आणि शिवसेना सचिव किरण पावसकर यांची आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका !!

आमदार आणि शिवसेना सचिव किरण पावसकर यांची आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका !!

***निवडणूक आयोगाचा निर्णय,विधानसभा अध्यक्षांचा निर्णय, सुप्रीम कोर्टाचा निर्णय जर तुम्हाला मान्य नाही, मग शिवसेनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये होते, ते घ्यायला तुम्ही कसे विसरला नाहीत? ते तुम्हाला कसे काय चालतात ? 

मुंबई, (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर) :
               निवडणूक आयोगाचा निर्णय, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय, सुप्रीम कोर्टाचा निर्णय जर तुम्हाला मान्य नाही, मग शिवसेनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये होते, ते घ्यायला तुम्ही कसे विसरला नाहीत? ते तुम्हाला कसे काय चालतात ? असा प्रश्न उपस्थित करत किरण पावसकर यांची उद्धव ठाकरेंवर टीका केली.
              मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर उठाव केला नसता, तर उद्धव ठाकरे परदेशात किंवा एखाद्या अरबाला शिवसेना विकून आले असते, वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्याचे काम मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवावर उदार होऊन केले आहे असंही यावेळी किरण पावसकर म्हणाले.वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेना कशी सांभाळली कशी वाढवली याची उद्धव ठाकरे यांना काहीच कल्पना नाही, त्यांनी फक्त शिवसैनिकांना कामापुरते वापरले आणि नंतर फेकून दिले असे  यावेळी किरण पावसकर यांनी बोलून सत्य समोर आणले आहे.
           ज्या शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी जीवाचे रान केले, त्यांना तुडविण्याची भाषा उद्धव ठाकरे करत आहेत.मान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक शिवसैनिक म्हणून ठाणे, कल्याण, पालघर मध्ये व उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेसाठी अहोरात्र काम केले, त्यांना अडवा-तुडवा अशी भाषा उद्धव ठाकरे करत आहेत, हे महाराष्ट्रातील कुठलाही शिवसैनिक सहन करणार नाही आणि हे बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार असूच शकत नाहीत. उद्धव ठाकरे यांनी जनतेचा आणि शिवसैनिकांचा वापर करून त्यांची मने, त्यांच्या भावना पायदळी तुडवण्याचे काम केले आहे.
            २०१९ च्या निवडणुकांमध्ये जे शिवसैनिक शिवसेनेसाठी मते मागण्यासाठी जनतेकडे गेले, त्यांच्या आणि ज्यांनी महायुतीत असलेल्या शिवसेनेला मतदान केले, त्या मतदारांच्या भावना उद्धव ठाकरे यांनी पायदळी तुडवल्या आहेत.आज तिथे उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेल्या लोकांना सुद्धा माझे हेच सांगणे आहे की, जो पर्यंत तुम्ही त्यांच्यासोबत आहात, तोपर्यंत सर्व ठीक राहील. पण एकदा का तुम्ही बाजूला गेलात, तर तुम्ही केलेले काम, पक्षासाठी घेतलेले परिश्रम सर्व विसरून यांना तुडवा असेच हा माणूस बोलणार आहे,अशा शब्दांत मान. आमदार आणि शिवसेना सचिव किरण पावसकर यांनी आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. 
              काल उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या महापत्रकार परिषदेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत बोलताना किरण पावसकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी काल प्रश्न केला की जर मी पक्षप्रमुख नसेन तर गृहमंत्री अमित शाह माझ्याशी महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीची चर्चा करण्यासाठी का आले ? मुळात उद्धव ठाकरे यांचा हा प्रश्नच हास्यास्पद आहे. अमित शाह तुमच्याजवळ आले कारण त्यावेळेस आमच्यासोबत असलेले ४० आमदार आणि तुमचे १६ आमदार तुमच्याजवळ होते आणि बाळासाहेबांना देखील देशाच्या राजकारणात मान आहे त्यांचा मान ठेऊन ते तुमच्याकडे आले होते. आज एवढे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत. आता ते तुमच्याकडे ढुंकून सुद्धा येणार नाहीत. उद्धव ठाकरे आणि उबाठा पक्षाला निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही, विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय मान्य नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य नाही, शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण कायदेशीररित्या आम्हाला मिळाले हे त्यांना मान्य नाही, मग त्याच शिवसेनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये होते, ते घ्यायला तुम्ही कसे विसरला नाहीत? ते तुम्हाला कसे चालतात?  आणि काल जो तुम्ही महापत्रकार परिषदेच्या नावाखाली तमाशा केलात, अनेक व्हिडीओ तुम्ही दाखवलात, त्यात हा ५० कोटी रुपयांचा चेक घेतानाचा व्हिडीओसुद्धा दाखवायचा होता; तो का दाखवला नाही ? आमच्याकडे असे अनेक व्हिडीओ आहेत, ते सर्व जर आम्ही जनतेसमोर आणले तर उद्धव ठाकरे तुम्हाला फिरणे मुश्किल होईल, असा इशारा मा. किरण पावसकर यांनी दिला. 
          ते पुढे म्हणाले की, ज्या हिंदुत्वाचा गवगवा उद्धव ठाकरे करताहेत त्याबद्दल बोलण्याचा त्यांना काही अधिकार नाही. १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेनन याच्या कबरीच्या सुशोभीकरण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच झाले होते. मालाडच्या उद्यानात टिपू सुलतान मैदान नाव देण्याचा प्रस्ताव आणि मदरश्यांचे आधुनिकीकरण करून त्यातील मौलवींचे पगार वाढवण्याचे प्रस्ताव मुख्यमंत्री म्हणून तुम्हीच दिले होते. पण दुसरीकडे तुम्ही मनपाच्या बंद पडणाऱ्या मराठी शाळा, अडीच ते तीन हजाराच्या तुटपूंज्या पगारावर काम करणारे ९२ मराठी शाळांमधील शिक्षक यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलात.
           ज्या काँग्रेसने राममंदिराला विरोध केला आज त्याच काँग्रेसच्या सोबत जाऊन तुम्ही बसलात, हेच तुमचे हिंदुत्व आहे का? उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्ष आणि शिवसैनिकांशी काहीही घेणे देणे नाही. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर उठाव केला नसता, तर उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र परदेशी जाण्याच्या बहाण्याने तिथल्या एखाद्या अरबाला शिवसेना विकून आले असते आणि नंतर त्याने कागदपत्रांसह शिवसेना आपली आहे असे सांगून शिवसेनेवर हक्क सांगितलं असता. वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्याचे काम मुख्यमंत्री शिंदे यांनी जीवावर उदार होऊन केले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल वावगे बोलण्याचा उद्धव ठाकरे यांना काहीच अधिकार नाही, असे मान.आमदार किरण पावसकर म्हणाले.

No comments:

Post a Comment

जिल्हा रुग्णालयात डायलेसिस उपचारासाठी आरसीएफच्यासीएसआर अंतर्गत आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द !

जिल्हा रुग्णालयात डायलेसिस उपचारासाठी आरसीएफच्या सीएसआर अंतर्गत आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द      रायगड, प्रतिनिधी :राष्ट्रीय के...