Thursday 18 January 2024

कांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छायाताई कुंडलीक बनकरी यांची बिनविरोध निवड, परिसरात जल्लोष !

कांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छायाताई कुंडलीक बनकरी यांची बिनविरोध निवड, परिसरात जल्लोष !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उद्योजक छगनशेठ बनकरी यांच्या मातोश्री श्रीमती छायाताई कुंडलिक बनकरी यांची आज झालेल्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाली, सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी व परिसरातील थोरामोठ्यांनी त्यांचे स्वागत व अभिनंदन केले.

कल्याण तालुक्यातील औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून कांबा ग्रामपंचायत ओळखली जाते, कल्याण मुरबाड महामार्गावर वसलेले कांबा ग्रामपंचायतीमध्ये कांबा गाव, पावशेपाडा, वाघेरापाडा, नानेपाडा, नैथरपाडा, पठारपाडा, पाचवामैल, असा परिसर येतो, महामार्गावर असल्याने व उल्हासनगर शहराजवळ वसल्याने येथे मोठ्या प्रमाणात उद्योग धंदे निर्माण झाले आहे. यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळत आहे तर ग्रामपंचायतीला कररुपाने उत्पन्न मिळते आहे. यामुळे या ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच प्रयत्नशील असतात. एकूण १३ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भारती महेंद्र भगत या अनुसूचित जमातीच्या महिला असून उपसरपंच पदी अनुसूचित जाती प्रवर्गातील सोनाली विजय उबाळे या होत्या, सध्या भारती भगत, संदिप पावशे, विजय उबाळे, पद्माकर शिरोसे, दत्ता भोईर, सुंगधा पावशे, वंदना पावशे, उषा गांवडे, छाया बनकरी, अरुण शिरोसे, इशा भोईर, संतोष पावशे, हरिदास सवार अरुण शिरोसे, दत्ता भोईर आदी सदस्यांचा समावेश आहे.

उपसरपंच सोनाली उबाळे यांचा ८/१० महिन्याचा कालावधी पुर्ण झाल्याने उपसरपंच पद रिक्त झाले होते. त्यानुसार आज उपसरपंच पदाची निवडणूक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये या पदाकरिता छायाताई कुंडलिक बनकरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची कांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. उपसरपंचपदी निवड होताच ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. उपसरपंच छायाताई बनकरी या फेब्रुवारी२०१०मध्ये सदस्यां म्हणून निवडून आल्या होत्या, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार कुमार आयलानी, शिवसेनेचे राजेंद्र चौधरी, दिलीप गायकवाड, दोनदा सरपंच झालेले माझी सरपंच मंगेश बनकरी, छगनशेठ बनकरी, वाशिंदचे उपसरपंच राजू भेरे, योगेश बनकरी, प्रभाकर पावशे, भगवान शिरोसे, देवराम शिरोसे, मधुकर शिरोसे, आत्माराम बनकरी, राजा ठाकरे, स्वप्नील भोईर, चितांमण चौधरी, राजेश बनकरी, विकास पवार, योगेश देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी प्रशासनातर्फे ग्रामविकास अधिकारी श्रीमती पाटील मँडम व त्यांच्या कर्मचारी वर्ग यांनी स्वागत व अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय परिसरात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जिल्हा रुग्णालयात डायलेसिस उपचारासाठी आरसीएफच्यासीएसआर अंतर्गत आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द !

जिल्हा रुग्णालयात डायलेसिस उपचारासाठी आरसीएफच्या सीएसआर अंतर्गत आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द      रायगड, प्रतिनिधी :राष्ट्रीय के...