Thursday 18 January 2024

अणू ऊर्जा सल्लागार बैठक मुंबईत संपन्न !!

अणू ऊर्जा सल्लागार बैठक मुंबईत संपन्न !!

मुंबई, (शांताराम गुडेकर/मोहन कदम) :

        तीन दिवशीय मध्यप्रदेश दौरा पूर्ण करून उच्चस्तरिय बैठकीसाठी मुंबईत दाखल झालेले अणू ऊर्जा शास्त्रज्ञ डॉ.मूर्ती यांची विविध क्षेत्रातील दिग्गजानी भेट घेतली.व्हिजन इंडियाचे अध्यक्ष स्वप्नील राणी नंदकुमार यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या प्रथम सत्रात श्री. मूर्ती यांना त्यांच्या अतिविशिष्ट सेवेसाठी संस्थांद्वारे सन्मानित करण्यात आले. यामध्ये शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सेनी महाप्रबंधक, इंडीयन मरीटाईम युनिव्हर्सिटी प्राचार्य कॅप्टन प्रमोद कुमार सिंह,पद्म पुरस्कार नामांकन प्राप्त डॉ.रवी वैरागडे,एसपीएसटी प्रमुख मंगेश रासम,मुंबई विद्यापीठ प्राचार्य हेमंत सामंत,अर्थ नियोजन सल्लागार ए. सुंदरेशन,सल्लागार श्री.सुब्बाराव,राजेंद्र भोसले आदींचा सन्मान, सत्कार करण्यात आला.द्वितीय सत्रात मान्यवरांच्या द्वारा संमेलन संबोधन एवं युवा राष्ट्र एकात्मता यावर कटिबध्दता व्यक्त करण्यात आली.पद्म पुरस्कार नामांकन प्राप्तीसाठी उपस्थित सर्व दिग्गजांनी साई भक्त श्री.मंगेश अंकुश रासंम यांचा विशेष सत्कार करत अभिनंदन केले. शिवाय त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment

जिल्हा रुग्णालयात डायलेसिस उपचारासाठी आरसीएफच्यासीएसआर अंतर्गत आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द !

जिल्हा रुग्णालयात डायलेसिस उपचारासाठी आरसीएफच्या सीएसआर अंतर्गत आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द      रायगड, प्रतिनिधी :राष्ट्रीय के...