Thursday 18 January 2024

पुण्यातील आण्णा भाऊ साठे नाट्यगृहात "विच्छा माझी पुरी करा" दोन अंकी धम्माल विनोदी नाटक !

पुण्यातील आण्णा भाऊ साठे नाट्यगृहात "विच्छा माझी पुरी करा" दोन अंकी धम्माल विनोदी नाटक !

मुंबई  -  ( दिपक कारकर )

श्री देव रवळनाथ, मल्लनाथ व सातेरी भावई देवीच्या कृपा आशीर्वादाने कोल्हापूर जिल्ह्यातील, चंदगड तालुक्यातील कलावंत मंडळी मुंबईतील यशस्वी प्रयोगानंतर पुणे रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. आजवर ७ ते ८ नाटयप्रयोग यशस्वीरित्या करून पुणे रंगभूमीवर श्री मल्लनाथ क्रिऐशन कानुर खुर्द, ता.चंदगड जि.कोल्हापुर प्रस्तुत, वसंत सबनिस लिखीत दिगंबर दोरुगडे दिग्दशीत "विच्छा माझी पुरी करा" हे दोन अंकी धम्माल विनोदी नाटक आण्णा भाऊ साठे,नाट्यगृह पदमावती ( पुणे ) येथे शुक्रवार दि.२६ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ : ०० वा.सादर होणार आहे.

या नाटकाचे निर्मीती प्रमुख गुंडू विष्णू झेंडे, लक्ष्मण सावंत, विनायक अमृस्कर, अमीत कबाडी यांच्या संकल्पनेतून, अनील दळवी, दत्तात्रय ता.जाधव, गणेश सुभेदार, संभाजी कडते यांच्या सहकार्याने, अरुण गावडे, युवराज पाटील, विठ्ठल सुतार, संदीप मोरे, हिमांगी सुर्वे, तेजश्री डस्के व नाट्यप्रयोगाचे सुत्रधार अशोक मामा नार्वेकर, सागर जो.गावडे, संपर्क प्रमुख बबन गवसेकर, विलास सावंत, जीवन गावडे यांच्या विशेष सहकार्याने सादर होत आहे. अधिक माहितीसाठी व नाट्य प्रयोगासाठी अशोक नार्वेकर - ९७०२७८५५४८/ दिगंबर दोरुगडे  - ९९२१६६६६२६  यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

जिल्हा रुग्णालयात डायलेसिस उपचारासाठी आरसीएफच्यासीएसआर अंतर्गत आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द !

जिल्हा रुग्णालयात डायलेसिस उपचारासाठी आरसीएफच्या सीएसआर अंतर्गत आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द      रायगड, प्रतिनिधी :राष्ट्रीय के...