Thursday 18 January 2024

साहित्य संघात "नमन" प्रयोग ; "चाकरमनी" नाट्यकृती होणार सादर

साहित्य संघात "नमन" प्रयोग ; "चाकरमनी" नाट्यकृती होणार सादर !!

मुंबई - ( दिपक कारकर ) :

कोकण म्हणजे नमन कलेची पंढरी होय. नमन कलेचा सुर आता मुंबई रंगभूमीवर चांगलाच गवसलेला दिसतो आहे. वाड - वडिलांनी जपलेला हा नमन लोककलेचा अनमोल ठेवा आजही कालपरत्वे बदल होतं असला तरी सार्वत्रिक पाहायला मिळतो.कोकणातील गाव - वाडीतील अनेक नमन मंडळे आपला संच घेऊन ह्या कलेचं सादरीकरण करत जतन - संवर्धन करताना दिसतात.

श्री गणेश वेल्फेअर सोसायटी हौशी कलामंच ( विरार ) तर्फे मुंबई रंगभूमीवर नमन प्रयोगाचे आयोजन शनिवार दि.२० जानेवारी २०२४ रोजी रात्रौ ०८ : ०० वा.साहित्य संघ मंदिर, गिरगाव ( मुंबई  ) येथे करण्यात आले आहे. शशिकांत तांबे निर्मित, अमित वणगे लिखित तर सूर्यकांत गोवळे दिग्दर्शित कोकणी माणसाच्या भौगोलिक घटकांवर आधारित,सामाजिक संदेश देणारी नाट्यकृती "चाकरमनी" सादर होणार आहे. अधिक माहितीसाठी निलेश वणगे - ७७९६२७९५०४ यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

माजी नगरसेवक शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेरील शेडवर कारवाई झाल्याने सर्वसामान्य शिवसैनिक संतप्त !!

माजी नगरसेवक शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेरील शेडवर कारवाई झाल्याने सर्वसामान्य शिवसैनिक संतप्त !! झालेली कारवाई सूडबुद्धीने - माजी नगरसेवक व...