Thursday 18 January 2024

ज्येष्ठ साहित्यिक, कोकण सुपुत्र कवी अशोक लोटणकर यांना एकता कल्चरल अकादमीचा साहित्य पुरस्कार !!

ज्येष्ठ साहित्यिक, कोकण सुपुत्र कवी अशोक लोटणकर यांना एकता कल्चरल अकादमीचा साहित्य पुरस्कार !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
            ज्येष्ठ साहित्यिक कवी अशोक लोटणकर यांना नुकतेच एकता कल्चरल अकादमीच्या पद्मश्री नारायण सुर्वे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.साहित्य संघ गिरगाव, मुंबई  येथे ज्येष्ठ अभिनेते लेखक अशोक समेळ यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री. लोटणकर यांना प्रदान करण्यात आला.या वेळी ज्येष्ठ गायिका पद्मश्री पद्मजा फेणानी यांचे सह अन्य मान्यवर आणि एकता कल्चरल अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव  आणि सहकारी उपस्थित होते.

             रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील साखरपा येथील मूळ रहिवाशी, मुंबई मधील मुलुंड येथे वास्तव्यास असलेले अशोक लोटणकर यांची एकूण २० पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांच्या साहित्य कृतींना मानाचे साहित्य पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत.अलिकडेच त्यांना कोकण साहित्य रत्न पुरस्काराने, तसेच दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान च्या साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांनी सातव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदही भूषविले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा गावचे सुपुत्र लोटणकर यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर, पत्रकार, वृत्तपत्र लेखक, ग्रामीण मंडळ, विविध संस्था, प्रतिष्ठान पदाधिकारी यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

माजी नगरसेवक शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेरील शेडवर कारवाई झाल्याने सर्वसामान्य शिवसैनिक संतप्त !!

माजी नगरसेवक शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेरील शेडवर कारवाई झाल्याने सर्वसामान्य शिवसैनिक संतप्त !! झालेली कारवाई सूडबुद्धीने - माजी नगरसेवक व...