.. आश्वासनाप्रमाणे शासकीय परिपत्रके द्या।
*यासाठी 9 फेब्रुवारी रोजी ठाण्याला मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शुभेच्छा मोर्चात सहभागी व्हा* - आशांचा मोर्चा द्वारे इशारा
चोपडा, प्रतिनिधी.. गेल्या 12 जानेवारीपासून आशा व गटपर्वतक त्यांच्या बेसिक मानधनात दहा हजार, सात हजार रुपये वाढ तसेच गटप्रवर्तक यांना त्यांच्या मानधनामध्ये दरमहा दहा हजार रुपये वाढ करणे, आरोग्यवर्धिनीचा लाभ देणे, या दोन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांना 2000 दोन हजार रुपये भाऊबीज देणे जे एस वाय योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात ए पी एल बीपी करता त्याचे लाभ आशांना देणे, संप काळातील मानधन शक्य असेल ते कामकाज भरून काढणे. ऑनलाइन कामकाजाबाबत आशांसाठी सुलभ यंत्रणा उभी करणे इत्यादी निर्णय मागील संपाचे वेळी सरकारने घेतलेले आहेत, परंतु निर्णयानुसार दोन महिने वाट पाहूनही सरकारने शासकीय परिपत्रक न काढल्यामुळे आशा गटप्रवर्तक यांना नाईलाजास्तव पून्हा संपावर उतरावे लागले आहे.
त्या आश्वासनुसार परिपत्रक काढावीत म्हणून चोपडा तालुक्यातील आशा गटप्रवर्तक यांचा आज बुधवार रोजी चोपडा तहसीलदार कार्यालयावर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळून दुपारी एक वाजता मोर्चा काढण्यात आला त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, वित्तमंत्री, आरोग्य मंत्री, उपमुख्यमंत्री यांचे विरोधात तीव्र नापसंती व्यक्त करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या चोपडा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा गेल्यावर नायब तहसीलदार श्री महाजन यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनातील मागण्या संदर्भात सरकारने ताबडतोब परिपत्रके काढावी त्यासाठी घोषणा देण्यात आल्या.
यासंदर्भात कार्यवाही व्हावी म्हणून *येत्या नऊ फेब्रुवारी रोजी माननीय मुख्यमंत्री यांचा वाढदिवस असून त्या वाढदिवसाला ठाणे येथे आशा कर्मचारी शुभेच्छा देण्यासाठी जाणार आहेत. 12 फेब्रुवारी रोजी सोमवारी जिल्हा परिषदेवर आशा गटप्रवर्तक यांचे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. असाही इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे मोर्चाचे नेतृत्व जिल्हा युनियनचे अध्यक्ष कॉ. अमृत महाजन, तालुका अध्यक्ष मीनाक्षी सोनवणे, विद्या सनेर, शालिनी पाटील यांनी केले. मोर्चात विद्या देवी बाविस्कर, कल्पना महाले, रत्नाबाई कोळी, रेखा पाटील, वंदना पाटील, संगीता मराठे, रत्नज्योत बाविस्कर, उरमात तडवी, शितल पाटील, सुरेखा कोळी, वंदना सोनार, सुरेखा महाजन, मीना चौधरी, रूपाली कोळी, शर्मिला साळुंखे, रंजना संगोरे, फरीदा तडवी आदींच्या शंभराच्या वर आशांचा सहभाग होता.. ठाणे येथील मोर्चासाठी ९ फेब्रुवारी शुक्रवारी ठाणे येथे पोचावे असे आवाहन संघटनेने केले आहे.
No comments:
Post a Comment