न्यू इंग्लिश स्कूल खांडोत्री - आबीटगाव येथे आठवणीत रंगला माजी विद्यार्थी स्मुर्तीगंध सोहळा !!
शाळेचे जुने मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता....
चिपळूण - ( दिपक कारकर ) :
आवडते मज मनापासूनी शाळा,लाविते लळा जशी माऊली बाळा!शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई - वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीच विसरल्या जात नाही हे वास्तव सत्य आहे. याच पार्श्वभूमीवर सदर सोहळा घेण्यात आला होता. कार्यक्रमाचा प्रारंभ हा राष्ट्रगीताने झाला. या कार्यक्रमामध्ये जवळ-जवळ ३००-१५० माजी विद्यार्थी उपस्थित होते. सन १९९४ ते २०२३ अशा तीस बॅचेस एकत्रित येऊन कार्यक्रम करण्यात आला. या तीस वर्षात ५० ते ५५ शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत होवून गेले होते. त्यापैकी कार्यक्रम दरम्यान ३० जन उपस्थित होते. त्यांचा देखील या कार्यक्रमामध्ये विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला शाळेचे आजी मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी शिक्षक तसेच आजी विद्यार्थी आणि शालेय समिती यांनी अनमोल सहकार्य केले. तसेच नावं नोंदणी, नास्ता, भोजन, मंडप सजावट, मंचक व्यवस्था, निमंत्रण व्यवस्था इ. हि कामे नियोजनबद्ध स्थानिक माजी विद्यार्थी कमिटीने पार पाडली. मुंबई आयोजन कमिटीने सुद्धा नियोजन उत्तम केले होते. दोन्ही कमिटीच्या सुसंवादाने कार्यक्रम यशस्वी झाला. सुरुवातीच्या काळात या शाळेचे बीजारोपण करणारे सर्वच शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी सुद्धा खूप समाधान व्यक्त केले. तसेच चार गावातील सरपंच, उपसरपंच आणि प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. त्याचप्रमाणे सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे या संस्थेचे संचालक मंडळ यांची सुद्धा उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे भव्य दिव्य स्वरूप पाहून त्यांनी सुद्धा प्रशंसा केली. चिपळूण तालुक्यात असा कार्यक्रम प्रथम पाहतोय असे ते म्हणाले. विशेष म्हणजे या कार्यकमात अध्यक्ष,स्वागताध्यक्ष, प्रास्ताविक, आभारप्रदर्शन, सूत्रसंचान या सर्व जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने माजी विद्यार्थ्यांनी पार पाडल्या. या शाळेने असंख्य उद्योजक, डॉक्टर, वकील, शिक्षक, कलाकार, छायाचित्रकार इतर क्षेत्रातील मंडळी घडवली आहे. त्यामुळे शाळेला सहकार्य करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम करण्यात आला. या स्मुर्तीगंध सोहळ्याची चर्चा आज सर्वत्र होत आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची आठवण शाळेत असावी म्हणून "माझी शाळा" अशी नामनिर्देश असणारी आणि शाळेची महती स्पष्ट करणारी एक प्रतिमा आणि संविधानाची उद्देशपत्रिका शाळेला भेट स्वरूपात देण्यात आली. तसेच अनेकांनी भेट स्वरूपात अनेक गरजेच्या गोष्टी भेट स्वरूपात दिल्या.
अशा रितीने हा स्मुर्तीगंध पुनर्मिलन अभूतपूर्व सोहळा घडून आला. "न भूतो न भविष्यती" अशी या सोहळ्याची ख्याती झाली. ज्यांनी हा नेत्रदीपक सोहळा याची देही याची डोळा पाहिला अनुभवला ते कृतार्थ झाले. अखेर या कार्यक्रमाची सांगता आजी-माजी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. प्रदीर्ध वर्षांनी विद्यार्थी - विद्यार्थिनी, शिक्षक एकमेकांना भेटल्याने अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला, जणू चेहऱ्यावरील आनंदच ओसंडून वाहत होता.
👍
ReplyDeleteधन्यवाद 💝🙏
ReplyDeleteधन्यवाद बातमी दिल्या बद्दल
ReplyDelete