आशा कर्मचाऱ्यांची निराशा होणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने आंदोलन स्थगीत !!
आता जीआर काढा - कॉम्रेड अमृत महाजन
चोपडा, प्रतिनिधी... महाराष्ट्र राज्यातील ७० हजार आशा व ४५०० गटप्रवर्तक या कर्मचाऱ्यांनी १८ ऑक्टोंबर २३ ते आठ नोव्हेंबर २३ या कालावधीपर्यंत आपल्या मागण्यांसाठी संप केला होता. या संपातील मागण्या महाराष्ट्र राज्य सरकारचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मध्यस्थी करून आशांना किमान १० हजार रुपये गटप्रवर्तक यांना १५ हजार रुपये पर्यंत शासकीय मानधन अधिक कामाचा मोबदला जो असेल तो मान्य करून आनंदाचा धक्का दिला होता, याच्याबरोबर जे एस वाय लाभ घेताना एपीएल बीपीएल करण्यात येणार नाही भाऊबीज दोन हजार रुपये दिवाळी यादी देण्यात येतील. आरोग्यवर्धिनीच्या मोबदला मिळेल गटप्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल अशा आशयाच्या मागण्याही मंजूर केल्या होत्या प्रत्यक्षात दोन महिने वाट पाहूनही मागण्यावर जीआर न निघाल्यामुळे आशा कर्मचाऱ्यांनी १२ जानेवारीपासून एक मार्चपर्यंत बेमुदत संप पुकारला. तसेच ०९ फेब्रुवारीपासून ०१ मार्चपर्यंत आजाद मैदानावर राज्यातील आशांनी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना कृती समितीचे नेते कॉम्रेड एम ए पाटील राजू देसले, आयटक सुमन पुजारी, आयटक भगवानराव देशमुख, शोभा शमीम सिटु ,आनंदी अवघडे आदींचे नेतृत्वाखाली आझाद मैदानावर मुंबईला ठाण मांडले.
या संपात मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अंदाजपत्रकीय अधिवेशनाचा समावेश समारोप करताना आशांची निराशा केली जाणार नाही अशी घोषणा केल्याने आशा कर्मचाऱ्यांचा संप तहकूब करण्यात आलेला आहे, तथापि सरकारच्या आशा व गट पुरवठा मागण्यांच्या प्रश्न मागील आश्वासनाच्या अनुभव लक्षात घेता या घोषणेने आशा कर्मचाऱ्यांमध्ये सांशकता कायम आहे तरी सरकार जीआर काढत नाही तो पर्यंत या घोषणेला काहीच किंमत नाही अशी आशा गटप्रवर्तक यांची खात्री झाली असून त्यांचेतील असंतोष मिटलेला नाही तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता अगोदर घोषणेनुसार परिपत्रक काढावेत अशी मागणी करणारे पत्रक जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटनेचे अध्यक्ष काँ अमृत महाजन, सचिव सुलोचना साबळे, मीनाक्षी सोनवणे, प्रतिभा पाटील, भारती कोळी, विद्यादेवी बाविस्कर, जाहिरा फारुकी, गटप्रवर्तक संघटनेच्या सुनिता ठाकरे, मनिषा बैरागी यांनी काढलेले आहे या मागणीच्या पृष्ठतेसाठी आशा व गट प्रवर्तक संघटने तर्फे लवकरच आंदोलन केले जाईल असा इशारा दिलेला आहे
No comments:
Post a Comment