जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान मॅरेथॉन संपन्न !!
**** आजी माजी आमदारांच्या हस्ते बक्षीस वितरण
कल्याण, (संजय कांबळे) : जीवनदीप शैक्षणिक संस्था जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतात यावर्षी ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समस्त महिला सन्मानार्थ, जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून टिटवाळा येथे महिला सन्मान मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन चे उदघाटन मुरबाड विधानसभेचे आमदार किसनजी कथोरे व कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
टिटवाळा येथे महिला मॅरेथॉन मध्ये जवळपास 300 हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला होता. सहभागी महिलांचे 18 ते 30 वयोगटातील 'गट-अ' आणि 30 पेक्षा अधिक वयोगटातील 'गट ब'असे दोन गट करण्यात आले होते. यावेळी सहभागी महिलांना मोफत टी-शर्टचे वाटप करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये गट-अ मध्ये प्रथम क्रमांक संगीता जंगले व द्वितीय क्रमांक तेजस्वी चौधरी यांनी पटकावला तर तृतीय क्रमांक रियानी गायकर व उत्तेजनार्थ समीक्षा चौधरी आणि वैष्णवी म्हात्रे यांनी पटकावला. तसेच गट ब मध्ये प्रथम क्रमांक दर्शना मगर व द्वितीय क्रमांक वृषाली मानूसकरे यांनी पटकावला तर तृतीय क्रमांक सुशीला बांभेरे व उत्तेजनार्थ मीनाक्षी मगर आणि अनिता कुंदे यांनी पटकावला. विजेत्या महिलांना रोख रक्कम, पैठणी साडी आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विजय सोनार, उपप्राचार्य हरेन्द्र सोष्टे यांनी केले. या कार्यक्रमास जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, संचालक प्रशांत घोडविंदे, सौ. स्मिता घोडविंदे, प्राचार्य डॉ. के.बी कोरे तसेच प्रकाश गाडे (भाजपा सोशल मीडिया प्रमुख) योगेश धुमाळ (कृषि उत्पन्न बाजार समिती कल्याण), राजाभाऊ चौधरी, भूषण जाधव, सुनिल सूरोशी, चंद्रकांत भोईर, अनंत डोरलेकर, प्रमोद नांदगावकर, सौ.वनिता जाधव (सरपंच वासुंद्री), सौ.निकिता पाटेकर (महिला बचत गट), श्री.मयूर सुरोशी (सरपंच रायते), सौ दिपाली बुटेरे (सरपंच पोई), जयराम लोणे, सुयोग मगर (माजी सरपंच घोटसई), दिलीप बुटेरे, जयेश शेलार (सामाजिक कार्यकर्ते) आणि इतर उपस्थित महिलांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.
No comments:
Post a Comment