नालासोपारा निळेगावात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उध्दघाटन....
*महिला व युवकांचा प्रवेशाने वातावरण शिवसेनामय*
नालासोपारा, प्रतिनिधी : नालासोपारा पश्चिम मधिल निळेगाव येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालय उध्दघाटन व कार्यकर्त्यानच्या जम्बो प्रवेशाने येथील वातावरण शिवसेनामय झाले. अनेक राजकीय पक्षांना भगदाड पडत असताना दुसरीकड़े शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग ही सुरु आहे.
महाराष्ट्राचे राज्याचे *मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब* यांचा विचाराने प्रेरित होऊन आज निळेगाव मधिल महिला व युवा कार्यकर्ते यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला. शिवसेना शहरप्रमुख आनंद नगरकर व शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांच्या हस्ते महिलांचे प्रवेश करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
राजकारणातील घडामोडींनी आता वेग घेतला आहे. शिवसेना पक्षाने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आपली बांधणी सुरु केली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी शिवसेना नेहमीच समाजकारणाला महत्व देते असे सांगून या नालासोपारा शहरातील समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. शिवसेनेची घोडदौड अशीच सुरु राहणार असून येणार्या सर्व निवडणुकीत शिवसेना चांगल्या प्रकारे यश प्राप्त करेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी शिवसेना लोकसभा समन्वयक नविन दुबे, अल्पसंख्यक जिल्हाप्रमुख शाहरूख भाई, उपतालुकाप्रमुख अजितभाऊ खांबे, उपतालुकाप्रमुख अतुल पाटील, उपशहरप्रमुख महेश निकम, शहर सचिव राजेश उत्तेकर, विभागप्रमुख दानिश करारी, विभागप्रमुख जयराम पंडीत व शाखा प्रमुख, महिला संघटक, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते..
No comments:
Post a Comment