Monday, 4 March 2024

समेळगाव येथे सखी ग्रुपच्या हळदी कुंकू सोहळ्यास १५०० महिलांनी घेतला सहभाग....

समेळगाव येथे सखी ग्रुपच्या हळदी कुंकू सोहळ्यास १५०० महिलांनी घेतला सहभाग....

*आशा सातपुते ठरल्या मानाचा पैठणीचा मानकरी*

नालासोपारा, प्रतिनिधी :- सखी ग्रुप यांच्या वतिने व मा.नगरसेवक धनंजय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी हळदी कुंकू सोहळ्याचे समेळगाव नालासोपारा येथे आयोजन करण्यात आले होते. आजच्या या आनंदाच्या सोहळ्यास जवळपास १५०० महिलांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.

सदर कार्यक्रमात महिलांना त्यांचा कला गुणांना वाव मिळावा रोजच्या दगदगीतुन थोडासा आराम आणि मनोरंजन व्हावे म्हणुन विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. हळदी कुंकू कार्यक्रमात विविध स्पर्धा घेण्यात आल्या जसे की, उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची, लकी ड्राॅ घेण्यात आल्या. उखाणे स्पर्धेत प्रथम क्रमांक आशा सातपुते, व्दितीय क्रमांक कल्पना गवस, तृतीय क्रमांक रूहिता गमरे व प्रियंका कांबळे यांनी बक्षिसे पटकाविले संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक सुरेखा कारंडे व पैठणी चा मानकरी आशा सातपुते या विजेत्या ठरल्या.

विजेत्या स्पर्धकांना संस्थापक अध्यक्ष रूचिता नाईक व जेष्ठ पत्रकार रविंद्र माने यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
सोहळ्यास मा.नगरसेवक धनंजय गावडे, जेष्ठ पत्रकार रविंद्र माने, आर पी आय उपाध्यक्ष सुरेंद्र राऊत दत्त मंदिराचे ट्रस्टी हेमंत कर्णिक, लीनाताई कर्णिक रूचिदा माने यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी अध्यक्षा रूचिता नाईक, रूचिदा माने, प्राजक्ता कापसे, आशा सातपुते, संगिता पासी, कांचन नवले, आशा आदिवाल, सपना सिंग, ममता गुजर, मोसमी कुन्नत, भाविका चावडा, रूहिता गमरे, प्रियंका कांबळे, वंदना ढगे, धनश्री शिंदे, रोशनी केमसे, अमृता सुळे, स्नेहल मडगावकर, निर्मला माने, दिपाली कानडे, गिता भाटी, समशाद पटेल, सुरेखा कारंडे, कल्पना गवस, श्रध्दा मोरे, दीक्षा नारकर, पुजा भंडारे, शालिनी सनंसे, कविता धनगर, श्रुती माने, वैष्णवी बेलेकर, प्रियंका काठले, प्रांजल खानविलकर, तन्वी कासारे, तनया कासारे यांनी मेहनत घेऊन सोहळा यशस्वी पार पाडला.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...