गाव तसं चांगल, पण नियोजनाअभावी वेशीला टांगल, वयोवृद्ध आजीची पाण्यासाठी भटकंती ! बीडिओ कडे तक्रार ?
इस्लामपूर (राजेश कांबळे) : शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचविणा-या शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील हे ज्या गावचे सुपूत्र आहेत, ते वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक हे गाव तसं चांगलं पण नियोजनाचा अभाव, सावळागोंधळ, अधिकारी कर्मचारी यांचे दुर्लक्ष यामुळे एका ८५ वर्षाच्या आजी ला गोठभर पाण्यासाठी अर्धा ते एक किलोमीटर भटकंती करावी लागते, यामुळे मात्र ते वेशीला टांगल, अशा परिस्थिती निर्माण झाली आहे.
सांगली जिल्हा, वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक हे ८ ते १० हजार लोकवस्तीचे गाव, थोर शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील हे या गावचे सुपूत्र, यामुळे या गावाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झाले आहे. या गावास वशी येथील विहिरीचा तसेच वारणा नदीतून आलेल्या पाईपलाईनचा पाणीपुरवठा केला जातो.
गावातील मागासवर्गीय वस्तीचा विचार केला तर, सिध्दार्थ नगर, गोतमनगर आणि आंबेडकर नगर अशा ३ प्रमुख लोकवस्ती आहेत, या बौध्द समाजासाठी, एक आड आणि २ विहिरी आहेत, पुर्वी याचा पाणीपुरवठा केला जात होता, विशेष म्हणजे, हे हक्काचे व मोफत पाणी मिळत असताना, आता या विहिरी देखभाल दुरुस्ती अभावी बुजण्याच्या स्थितीत आहेत, हे हक्काचे पाणी सोडून आता विकत पाणी पिण्याची वेळ या समाजावर आली आहे. विशेष म्हणजे या नव्या विहिरीच्या बाजूला असलेल्या जागेवर भव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन निर्माण करण्यात येणार आहे, या जागेची पाहणी देखील झाली आहे. मात्र त्याचे पुढे काय झाले हे अद्याप कळले नाही, हे भवन झाले तर या विहिरीचे पाणी उपयोगात येवू शकते, या विहिरीची देखभाल दुरुस्ती, गाळ काढणे, डागडुजी करणे आदी कामाबाबत ग्रामपंचायतीस सांगितले होते, परंतु या घटनेस ४/५ महिने झाले मात्र यावर कारवाई झाली नाही.
दुसरे असे की ऐतवडे बुद्रुक येथील आंबेडकर नगर, करजंवडे रस्ता या परिसरात राहणाऱ्या साधारण पणे ८५ वर्षे वयाच्या वयोवृद्ध आजी श्रीमती पवित्राबाई जयवंत कांबळे यांच्या ग्रामपंचायतीने पुरविलेल्या घरगुती नळाला गेल्या दोन आठवड्यापासून पाणीच येत नसल्याने त्यांच्या वर अर्धा ते एक किलोमीटर अंतरावरून पिण्यासाठी पाणी आणण्याची वेळ आली असून याबाबत ऐतवडे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच, पाणी पुरवठा कर्मचारी यांच्या कडे तक्रार करून दखल करुनही दखल न घेतल्याने अखेर याबाबत वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आबासो कराड यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे, यानंतर देखील कारवाई झाली नाही तर पाणी पट्टी न भरण्याचा इशारा या आजीचा मुलगा संजय कांबळे यांनी दिला आहे, शिवाय सीईओ ची भेट घेऊन सदरचा प्रकार सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.
करंज वडे रस्त्यालगत लोकवस्ती असून तेथे पवित्राबाई जयवंत कांबळे या वयोवृद्ध आजी राहतात, घरपट्टी पाणीपट्टी भरण्यात त्या नेहमीच आघाडीवर असतात,असे असूनही गेल्या २ आठवडयापासून त्यांच्या घरगुती नळाला पाणी येत नाही, याबाबत त्यांनी स्वतः २ ते अडिच किलोमीटर अंतरावरून जाऊन ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार सांगितली, मात्र, सदस्य, सरपंच, पाणी पुरवठा कर्मचारी शितल पाटील हे बघू, करु, असे बोलून खांदे उडवले, तर ग्रामपंचात ग्रामसेवक श्री कोळी यांना फोन केले, मात्र त्यांनी उचवले नाहीत, त्यामुळे अखेरीस त्यांचा मुलगा संजय कांबळे यांनी वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आबासो पवार यांच्या कडे तक्रार केली. यानंतर थोडिफार हालचाल झाली, मात्र तोपर्यंत या आजीला अर्धा ते एक किलोमीटर अंतरावरील बोअरवेलचे पाणी आणावे लागत आहे, घरपट्टी पाणीपट्टी वसुली करता तर सोईसुविधा पुरविणे हे ग्रामपंचायतीचे काम आहे, मात्र ते करताना दिसत नाहीत, त्यामुळे ऐवढ्या अंतरावरून पाणी आणतांना माझ्या आईला काही झालं तर याची सर्व जबाबदारी ग्रामपंचायतीची असेल असे सांगून पाणीपट्टी न भरण्याचा इशारा त्यांचा मुलगा संजय कांबळे यांनी दिला आहे.
गावात अनेक पाणी स्त्रोत आहे, ओढा आहे, परंतु योग्य नियोजनाचा अभाव, उदासीनता, निष्काळजीपणा,आदीमुळे ऐन उन्हाळ्यात गावास एक दिवसा आड पाणी पुरवठा केला जातो, अजून एप्रिल व मे महिना बाकी आहे, त्यामुळे भविष्यात किती दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल हे काय सांगता येत नाही. त्यामुळे सध्या तरी गाव तसं चांगलं पण नियोजना अभावी वेशीला टांगल अशी म्हणण्याची वेळ या पवित्राबाई कांबळे या आजीवर आली आहे.
No comments:
Post a Comment