Saturday, 16 March 2024

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा वाढदिवस व महिला दिनानिमित्त हळदीकुंकू समारंभ संपन्न !!

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा वाढदिवस व महिला दिनानिमित्त हळदीकुंकू समारंभ संपन्न !!

कल्याण, प्रतिनिधी : कल्याण पश्चिम वार्ड क्रमांक २३ तर्फे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा वाढदिवस व महिला दिनानिमित्त हळदीकुंकू समारंभ शुक्रवारी ८ मार्चला आयोजित केला होता. या हळदीकुंकू समारंभाला महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळाला. 

या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या कल्याण शहर सरचिटणीस निता देसले व कल्याण शहर उपाध्यक्ष सुधिर वायले तसेच वार्ड क्रमांक २३ अध्यक्षा भारती बुटाला यांनी केले होते. समारंभाची सुरुवात वार्ड अध्यक्षा भारती बुटाला यांनी दिप प्रज्वलीत करून केली. या समारंभाला प्रभागातील शेकडो महिलांनी सहभाग नोंदविला. या वेळी भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेश समन्वयक रविंद्र महाडिक यांनी होम मिनिस्टर या कार्यक्रमाद्वारे उपस्थित महिलांचे मनोरंजन केले, तसेच लकी ड्रॉ कुपन द्वारे विजेता महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. समारंभात सहभागी झालेल्या सर्व माता भगिनींचा वाण देऊन सन्मान केला गेला. या कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे मा. आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील  व कल्याण शहराध्यक्ष (महिला) वैशाली पाटील तसेच अनेक मान्यवर व भाजपचे पदाधिकारी, महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...