Tuesday 16 April 2024

ओम हॉस्पिटल च्या सुसज्य नवीन वास्तूचा शानदार उद् घाटन सोहळा उत्साहात संपन्न !!

ओम हॉस्पिटल च्या सुसज्य नवीन वास्तूचा शानदार उद् घाटन सोहळा उत्साहात संपन्न !!

पाचोरा, प्रतिनिधी : पाचोरा शहरांमध्ये रुग्णांना अद्यावत आरोग्यदायक सेवा सुविधा उपलब्ध होण्यासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर विवेकानंद नगर आर के जिम जवळ रिंग रोड पाचोरा येथे डॉक्टर अजय सिंग परदेशी, नेहा परदेशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नवीन भव्य अद्यावत वास्तूचा ओम हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर ओम स्पीच अँड हियरिंग क्लिनिक चे उद्घाटन पाचोरा भडगाव विधानसभेचे माजी आमदार भाऊसाहेब श्री दिलीप वाघ यांच्या शुभहस्ते दिनांक १०/०४/२०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार आप्पासाहेब किशोर पाटील होते याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वागत व सत्कार डॉक्टर अजय परदेशी व मित्र परिवाराच्या शुभ हस्ते करण्यात आला आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या भाषणात डॉक्टर अजय सिंग परदेशी व सौ नेहा परदेशी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर आपल्या परिसरातील रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा मिळावी या हेतूने प्रेरित होऊन गेल्यादहा वर्षापासून आपल्या वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली पाचोरा भडगाव परिसरातील रुग्णांची चांगल्या प्रकारे या परदेशी दाम्पत्यांनी सेवा केल्यामुळे आणि त्यांनी केलेल्या सेवेमुळे रुग्णांचे आजारपण दुरुस्त होत असल्याने त्यांना या व्यवसायात यश मिळाले आणि म्हणून भूतकाळापेक्षा भविष्य काळामध्ये रुग्णांना अद्यावत माफक योग्य दरात सेवा मिळावी यासाठी त्यांनी आज भव्य दिव्य असे ओम हॉस्पिटल ही वास्तू रुग्णसेवेसाठी निर्माण केली आहे.

डॉक्टर अजय परदेशी यांच्या धर्मपत्नी सौ नेहा परदेशी यांनीही जळगाव जिल्ह्यामध्ये इतरत्र कुठेही होम स्पीच् अँड हियरिंग क्लिनिक नसताना पाचोरा शहरात मतिमंद मुलांना कर्णबधिर रुग्णांना सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल डॉक्टर अजय परदेशी असो नेहा परदेशी यांचे अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो भविष्यकाळात त्यांच्या हातून अशाच प्रकारची रुग्णांची आरोग्यदायक सेवा घडो अशा शुभेच्छा देतो आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ म्हणाले की डॉक्टर अजय परदेशी व सौ नेहा परदेशी यांनी अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय क्षेत्राचा वारसा नसताना डॉक्टर अजय स्नेहा यांनी डॉक्टर ही पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी आपल्या या वैद्यकीय क्षेत्रामध्ये पाचोरा शहरातच गेल्या दहा वर्षापासून रुग्णसेवेला सुरुवात केली म्हणजे 2014 ते 2024 या काळामध्ये पाचोरा भडगाव मराठवाड्यातील सोयगाव तालुक्यातील रुग्णांची या दाम्पत्याने चांगल्या प्रकारे रुग्णसेवा केली आणि त्याचे आज फलित म्हणून नवीन भव्य अद्यावत वास्तूचे म्हणजे ओम स्पीच हॉस्पिटल अँड हियरिंग क्लिनिकचे उद्घाटन माझ्या शुभ असते संपन्न होत आहे डॉक्टर अजय परदेशी हा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेने चालवलेल्या श्री गोसे हायस्कूल पाचोरा येथील विद्यार्थी होता आपल्या संस्थेने आज पर्यंत असे अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले आणि या गुणवंत विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या परिसरातच वैद्यकीय सेवाला सुरुवात केलेली आहे याचे मला सार्थ अभिमान वाटतो डॉक्टर अजय परदेशी व सौ नेहा परदेशी यांचे अभिनंदन करून त्यांच्या हातून गोरगरीब रुग्णांची चांगल्या प्रकारे सेवा घडो त्यांना या वैद्यकीय क्षेत्रात यश मिळो अशा शुभेच्छा देतो याप्रसंगी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दादासाहेब सचिन सोमवंशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी नगरसेवक विकास पाटील यांनी यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर अजय परदेशी व सौ नेहा परदेशी यांच्या वैद्यकीय कार्याचा गुण गौरव केला डॉक्टर अजय परदेसी व सौ नेहा परदेशी यांच्या जीवन कार्याचा परिचय डॉक्टर विलास पाटील यांनी करून दिला याप्रसंगी व्यासपीठावर आमदार किशोर आप्पा पाटील माजी आमदार दिलीप वाघ नानासाहेब संजय वाघ ताईसाहेब वैशाली सूर्यवंशी दादासाहेब सचिन सोमवंशी माजी नगराध्यक्ष संजय गोहिल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्राध्यापक गणेश पाटील पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बापूसाहेब सतीश शिंदे, नगर सेवक विकास पाटील, आर के जिमचे संचालक राजेंद्र काळे, श्री गोसे हायस्कूल पाचोरा येथील पर्यवेक्षक ए बी अहिरे, कुवरसिंग परदेशी, प्रताप परदेशी उपस्थित होते. ओम हाॅस्पीटल शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या,कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.सी.एन.चौधरी यांनी केले, आभार डॉ. नेहा परदेशी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रीन ॲपल इव्हेंटने परिक्षम घेतले कार्यक्रमासाठी शहरातील डॉक्टर असोसिएशनचे मान्यवर डॉक्टर व पदाधिकारी परदेशी परिवाराचे नातेक आप्तेष्ट प्रेमीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

धावत्या ट्रेन मधून पडून डोंबिवलीतील २६ वर्षीय तरुणीचा मृत्यु !!

धावत्या ट्रेन मधून पडून डोंबिवलीतील २६ वर्षीय तरुणीचा मृत्यु !! भिवंडी, दिं.२९,अरुण पाटील (कोपर)       धावत्या ट्रेन मधून पडून ड...