Tuesday 16 April 2024

भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे पारडे जड !!

भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे पारडे जड !!

**** सध्याच्या खासदारांविषयी असलेली नाराजी, महाविकास आघाडीला असलेली सहानुभूती 

भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात, यामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड यांचा समावेश आहे. आगरी, कोळी, कुणबी, मुस्लिम, आदिवासी अशा मतदारांचा भरणा असलेला मतदारसंघ आहे.

या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासमोर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी घोषित केली होती.

या जागेवर जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे काँग्रेस तर्फे इच्छुक होते. मात्र ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने निलेश सांबरे यांनी अपक्ष उमेदवारी घोषित केली असून वंचित बहुजन आघाडीतर्फे पाठिंबा जाहीर झाला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक खात्यावरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कपिल पाटील यांच्यासमोर आता सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले निलेश सांबरे यांचेही आव्हान उभे टाकले आहे. निलेश सांबरे यांचे शैक्षणिक, आरोग्य तसेच सामाजिक क्षेत्रात गेले पंधरा वर्षे  मोठ्या प्रमाणावर कार्य असून मतदारसंघात प्रत्येक गावागावात तसेच शहरातील जवळपास सर्वच प्रभागात कार्य पोहोचले आहे.

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे आगरी समाजाचे असून या समाजाचे मोठे प्राबल्य या मतदारसंघात आहे. या मतदारसंघात परिचित असे नाव असून आगरी, कोळी समाजामध्ये सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) लोकप्रिय आहेतच पण इतर समाजातही नेहमीच कुणाच्याही अडचणीत मदत करणारे अशी प्रतिमा आहे, याव्यतिरिक्त महाविकास आघाडीचा परंपरागत असलेला मुस्लिम मतदार तसेच उध्दव ठाकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, मतदारसंघातील सध्याच्या खासदार यांच्या विषयी पक्षांतर्गत दिसत असलेली नाराजी व मतदारसंघातील सत्ताविरोधी वातावरण महाविकास आघाडीला असलेली सहानुभूतीची लाट या सर्वांचा परिणाम निकालात दिसून येऊ शकतो.

तशातच या मतदारसंघात उभे असलेले जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या उमेदवारी मुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कपिल पाटील याचेच नुकसान होताना दिसत आहे.

सध्या आमच्या प्रतिनिधीनी संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला असता राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांचे पारडे जड वाटत आहे.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...