Friday 31 May 2024

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प), मुंबई या रात्र शाळेचा निकाल सलग पाच वर्षे 100% शंभर टक्के !!!

मुंबई प्रतिनिधी, तारीख- 1, पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ, भिवंडी संचलित संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला पश्चिम,  या रात्र शाळेचा सलग पाच वर्षे  एस.एस.सी. बोर्ड परीक्षेचा 100% निकाल लागल्याने, संस्थेमध्ये, रात्र शाळेचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग आणि नेहमीच मदतीचा हात देणारी मासूम संस्था असे सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या  एस. एस. सी. बोर्डाचा परीक्षेचा निकाल सोमवारी दि.२७ मे २०२४ रोजी दु.१ वा. सायबर कॅफे अथवा इंटरनेट मोबाईल या माध्यमातून जाहीर झाला.  संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलमध्ये पाच वर्षे यशस्वी परंपरा कायम राखत येथील विद्यार्थ्यांनी बाजी मारत शाळेचा शंभर टक्के निकाल दिला आहे . व्हावले आरती प्रकाश  - 65.00 टक्के मिळवून प्रथम तर जाधव अमृता बाळू 60. 00 टक्के गुण मिळवुन द्वितिय, कु. जोगदंकर जयश्री गणेश हिने  55.80 टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थिनी समाधान कारक गुण संपादित करत शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
दिवसा शाळेप्रमाणेच रात्र शाळेमध्ये शिक्षण दिले जाते. दिवसाच्या शाळेत जो अभ्यासक्रम 5 तासात इयत्ता 10 वी मध्ये शिकवला जातो तोच अभ्यासक्रम 3:30 तासात रात्र शाळेत शिकवला जातो. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी साडेतीन तासाची वेळ कमी पडते परिणामी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जादा तासिका घ्याव्या लागतात. त्यामुळे रात्र शाळेचाही कार्यकाळ हा पाच  तासाच्या ही जास्त होतो म्हणून सरकारने विशेष बाब म्हणून रात्र शाळांना पूर्णवेळचा दर्जा दिला पाहिजे, असे मत रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत सर यांनी मांडले. 

 ते पुढे असे म्हणाले, रात्र शाळेत शिक्षण घेणारा नियमित विद्यार्थी तर असतोच पण त्याचबरोबर अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करणारे, कामातील प्रमोशन मिळावे, चांगलं काम धंदा मिळावा, रिक्षा टॅक्सीचे बॅच- बिल्ले काढता यावेत अशा  विविध कारणांसाठी शिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थी रात्र शाळेत प्रवेश घेत असतात. 

रात्र शाळेत शिक्षण घेणारा विद्यार्थी हा गरीब विद्यार्थी आहे. कुर्ला पश्चिम मुंबई येथे पसरलेल्या दाटीवाटीच्या झोपडपट्टीत राहणारे विद्यार्थी दिवसा काबाड- कष्ट करतात, 12 तासांची नोकरी करून धावपळ करत, आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करणारा विद्यार्थी, रात्र शाळेत शिक्षण घेत असतो. अशा रात्र शाळेत शासनाने लक्ष द्यावे. काम धंदा करून उपाशीपोटी रात्रशाळेत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याला अल्पोपहार मिळावा तसेच शिक्षणासाठी लागणारे साहित्य मोफत उपलब्ध करून द्यावेत असे मुख्याध्यापक श्री राऊत सर यांनी सांगितले. 
 रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री राऊत सर हे सन 2018 सालात   मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्यापासून रात्र  शाळेचा निकाल सतत उंचावलेला आहे. मार्च 2020 पासून ते मार्च 2024 अशा सलग पाच वर्षात  इयत्ता दहावीच्या वर्गाचा, बोर्ड परीक्षेचा निकाल 100% लागला आहे. 

100% निकाल लागण्यासाठी रात्र शाळेतील परीक्षेत बसलेले विद्यार्थी, मुख्याध्यापक श्री राऊत सर, शिक्षक वर्ग श्री समाधान सुभाष खैरनार सर, श्री विरकर, श्री पद्माकर फर्डे सर, यांनी खूप कष्ट घेतले. त्यामुळे सर्वांचीच अभिनंदन सर्वांकडून करण्यात येत आहेत.
त्याचबरोबर पाच वर्षे  10 वी बोर्डाचा निकाल 100% मिळवण्यास सतत ऊर्जा मिळत गेली. ती आमच्या संस्थेचे अध्यक्ष मा. श्री विजय जाधव सर कार्याध्यक्ष मा. श्री बी .डी. काळे सर तसेच सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून. 

मागील वर्षी रात्र शाळेत समायोजनाने दिलेले शिक्षक शासनाने तडकाफडकी काढून टाकले. त्यामुळे रात्र शाळेत इंग्रजी, गणित, विज्ञान सारखे महत्त्वाचे विषय शिकवणारे शिक्षकच राहिले नाहीत. शिक्षण विभागाकडे सतत शिक्षकांची मागणी करूनही संपूर्ण वर्षभर  रात्र शाळेत इंग्रजी, गणित, विज्ञान सारखे महत्त्वाचे विषय शिकवण्यासाठी शिक्षकच मिळाले नाहीत. 
रात्र शाळेत शिकणारा विद्यार्थी गरीब आहे. तो काबाड कष्ट करून शिक्षण घेतो, म्हणून त्याच्या शिक्षणासाठी शासनाने महत्त्वाचे शिक्षक रात्र शाळेला द्यायला पाहिजे होते परंतु आजपर्यंत तीन वर्ष महत्त्वाच्या विषय शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत यासाठी दाद कोणाकडे मागावी? असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.
मासूम संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय निकिता केतकर मॅडम व त्यांची पूर्ण टीम,   एस.एस.सी डिपार्टमेंट सांभाळणारे श्री शशिकांत गवत सर, श्री पाटील सर तसेच प्रोजेक्ट मॅनेजर कुमारी धनश्री धनावडे मॅडम या सर्वांनी  नेहमीच वेळप्रसंगी मदतीचा हात पुढे करून एक प्रकारे संजीवनी देण्याचे कार्य मासूम संस्था गेल्या 10 वर्षांपासून रात्र शाळेत करत आहे. मासूम परिवाराचे आभार रात्र शाळेकडून व संस्थेकडून मानले आहेत.

आज संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला ही रात्र शाळा परिसरात नावारूपाला आली आहे. म्हणून पालकांना  मुख्याध्यापकांच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे की, आपल्या पाल्याचे प्रवेश, इयत्ता 8वी, 9वी, 10वी साठी आजच निश्चित करा.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र चेंबर ऑफ हैसिंग इंडस्ट्रीज कल्याण डोंबिवली युनिटची १४वी वार्षिक सर्वसाधरण सभा संपन्न !!

महाराष्ट्र चेंबर ऑफ हैसिंग इंडस्ट्रीज कल्याण डोंबिवली युनिटची १४वी वार्षिक सर्वसाधरण सभा संपन्न !! ** कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्...