Wednesday, 1 May 2024

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !!

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !!

कल्याण, प्रतिनिधी : जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष निलेश सांबरे यांना न्यू हिंदुस्थान कामगार सेनेने समाज रत्न पुरस्कार २०२३-२४ ने सन्मानित केले. कल्याण पश्चिम येथील मराठा मंदिर सभागृहात न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्यावतीने कामगार दिनानिमित्त एक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात निलेश सांबरे यांना न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्या मते, निलेश सांबरे याचं व्यक्तिमत्व समाजातील विविध स्थरातील रत्नांपैकी एकमेव आहे. तसेच सांबरे यांनी जिजाऊ संघटनेमार्फत केलेल्या समाजकार्याचा सार्थ अभिमान असल्याचंही पुरस्काराच्या प्रमाणपत्रात नमूद केले आहे. निलेश सांबरे यांच्या समाजसेवेचा आदर्श इतरांनीही घ्यावा आणि समाजात सुसंस्कृत व सुशिक्षित वर्ग निर्माण होण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून हा गौरव प्रदान केल्याचं न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमामध्ये जिजाऊ संघटनेचे अनेक पदाधिकारी निलेश सांबरे यांच्यासोबत उपस्थित होते. तसेच न्यू हिंदुस्थान कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष समीर पिंपळे, सरचिटणीस हर्षवर्धन साईवाला आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य कार्यक्रमात हजर होते.

No comments:

Post a Comment

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...