Friday 7 June 2024

दहावी बारावी नंतर काय? शृंगारतळी येथे १० जून रोजी पालक-विद्यार्थ्यांसाठी विना शुल्क मार्गदर्शन- प्रमोद गांधी यांचा स्तुत्य उपक्रम !!

दहावी बारावी नंतर काय? शृंगारतळी येथे १० जून रोजी पालक-विद्यार्थ्यांसाठी विना शुल्क मार्गदर्शन- प्रमोद गांधी यांचा स्तुत्य उपक्रम !!
 

[ गुहागर : उदय दणदणे ] -

दहावी बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून विद्यार्थी पालकांमध्ये दहावी-बारावी नंतर पुढे काय? याची चिंता सतावत असते, मात्र ही विद्यार्थी-पालकांची चिंता आता दूर होणार असून, सातत्याने शैक्षणिक गुणवत्तावर भर देणारे गुहागर तालुक्यातील समाजनेते, गुहागर तालुका मनसे संपर्क प्रमुख अध्यक्ष तसेच "कोकण कट्टा" संस्थापक- प्रमोद गांधी यांच्या वतीने  सोमवार दिनांक-१० जून २०२४ रोजी, ओंकार मंगल कार्यालय, लगुन कुटीरच्या जवळ, गुहागर-चिपळूण रोड, शृंगारतळी, ता.गुहागर येथे विद्यार्थी-पालकांसाठी "विना शुल्क" करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले असून, दहावीसाठी सकाळी - १० वा, तर बारावीसाठी सकाळी ११-३० वा. मार्गदर्शन सत्र होईल, सदर मार्गदर्शन सत्राला वक्ते म्हणून डॉ.नरेंद्र सोनी -प्राचार्य (महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग -वेळणेश्वर) यांचे सखोल मार्गदर्शन लाभणार आहे.जास्तीत जास्त विद्यार्थी - पालकांनी ह्या विना शुल्क मार्गदर्शन सत्राचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन समाजनेते प्रमोद गांधी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...