Sunday, 9 June 2024

आपली माती आपली माणस सामाजिक संस्थेतर्फे तीन हजार झाडे वाटप !!

आपली माती आपली माणस सामाजिक संस्थेतर्फे तीन हजार  झाडे वाटप !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
             जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधत मुंबईतील आपली माती आपली माणस या सामाजिक संस्थे तर्फे पोलादपूर तालुक्यातील १३ गावात देशी विदेशी झाडे वाटप करण्यात आली. यंदाचे या सामाजिक संस्थेचे झाडे वाटप सोहळ्याचे ७ वे वर्ष होते. रविवार दि. ९ जून २०२४ रोजी सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे चौक, खोपड येथे झाडे वाटप कार्यक्रमाची सुरुवात सहसंपर्क प्रमुख रायगड जिल्हा चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ३००० हून अधिक झाडे वाटप करण्यात आली.

आपली माती आपली माणस सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राज पार्टे यांच्या अध्यक्षतेखाली संस्था गेली ७ वर्ष रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात झाडे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. डोंगरावर लावण्यात येणाऱ्या वणवा याच्यामुळे अनेक झाडे तसेच मुसळधार पावसात झाडे कोसळून मातीचे भूस्खलन होत असल्याने त्याचा परिणाम वृक्षांवर अधिक होत असल्याने तालुक्यातील वनसंपदा टिकावी आणि पर्यावरणाचे समतोल राहावे यासाठी या सामाजिक संस्थे तर्फे पावसाळ्यात विविध झाडे वाटप होत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष राज पार्टे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...