Tuesday 11 June 2024

व्हाँईस आँफ मिडीया पत्रकार संघटनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी मंगल डोंगरे यांची बिनविरोध निवड !!

व्हाँईस आँफ मिडीया  पत्रकार संघटनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी मंगल डोंगरे यांची बिनविरोध निवड !!

मुरबाड ( प्रतिनिधी ) : देशात नंबर १, असलेल्या व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढणाऱ्या जागतिक पत्रकार संघटनेच्या ठाणे जिल्ह्याची सर्वसाधारण सभा आज कल्याण येथील शासकीय विश्राम ग्रुहात संघटनेचे  मुंबई-कोकण विभागीय अध्यक्ष-अरुणजी ठोंबरे, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर सभेत रिक्त असलेल्या ठाणे जिल्हा अध्यक्ष पद नियुक्ती बाबत प्रस्ताव मांडण्यात आला असता, उपस्थितांत सर्वानुमते ठराव  घेऊन, ठाणे जिल्हा अध्यक्षपदी दै.ठाणे वैभवचे झुंजार पत्रकार मंगलजी डोंगरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. डोंगरे हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात सुपरिचित असुन, पत्रकारांच्या सुखदुखात धावून जाणारे, अन्याय-अत्याचारा विरोधात लढणारे, अन्यायग्रस्ताना न्याय मिळवून देणारे, सामाजिक क्षेत्रातील सेवाभावी पत्रकार आहेत. त्यांना पत्रकारांच्या समस्यांची जाणीव असुन, त्यांना मिळालेल्या या संधीचं ते नक्कीच सोनं करतील असा आशावाद उपस्थितीतांनी व्यक्त केला. तर संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या शासकीय दरबारी प्रलंबित असणाऱ्या समस्यांना सर्वांना सोबत घेऊन, सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा महाराष्ट्रात कसा अग्रेसर राहील. यासाठी अभिवचन देत आपल्यावर सोपवलेल्या पदाची जबाबदारी त्यांनी स्विकारली आहे.

            तर यावेळी या कार्यक्रमासाठी खासकरून उपस्थित असलेले श्री. अरुणजी ठोंबरे-अध्यक्ष कोकण मुंबई विभाग,  तसेच कोकण प्रभारी- सुरेशजी जगताप, कोकण विभागीय कार्यवाह- जाँनी डेव्हिड, शहापूर तालुका अध्यक्ष-राजेश जागरे, भिवंडी तालुका अध्यक्ष-अशोक पाटोळे, कल्याण तालुका अध्यक्ष- जगदीश खंबाळे, मुरबाड तालुका सचिव- सचिन वाघचौडे, कुणाल म्हात्रे, राजु चाऊसकर, विलास भोईर, डॉ. अजिंक्य डोंगरे, यांसह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.
         व्हाँईस आँफ मिडिया हि संपूर्ण देशभरात सर्वात जास्त पत्रकार सदस्य संख्या असलेली संघटना असुन,तिची रेकॉर्ड आँफ गिणीज बुकात नोंद झाली आहे. हि संघटना केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेर ही अनेक देशात पत्रकारांसाठी कार्यरत आहे. या संघटनेचे संस्थापक -राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे हे नेतृत्व करत असुन, आज जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संघटनेची मुहूर्तमेढ ठाणे जिल्ह्यात रोवली गेली असल्याने पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...