Tuesday 11 June 2024

चोपडा नगरपालिका कंत्राटी सफाई कामगारांचा संपाच्या दुसरा दिवस आयटक चा पाठिंबा !!

चोपडा नगरपालिका कंत्राटी सफाई कामगारांचा संपाच्या दुसरा दिवस आयटक चा पाठिंबा !!

जळगाव (चोपडा), प्रतिनिधी... चोपडा नगरपालिका अंतर्गत कार्यरत घनकचरा व्यवस्थापन कंत्राटी कर्मचारी यांनी संप पुकारल्यामुळे शहरांमध्ये कामावर प्रणाम झालेला आहे या कर्मचाऱ्यांना न्याय वेतन मिळावे म्हणून महाराष्ट्र राज्य आयटकचे राज्य उपाध्यक्ष काँग्रेस अमृत महाजन यांनी शासन दरबारी पट पाठपुरावा चालविलेला आहे. 

   याबाबत सविस्तर असे की__ कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन अधिक विशेष भत्ता मिळावा, साप्ताहिक सुटी मिळावी, आजारपणाची रजा मिळावी म्हणून चोपडा नगरपालिकेत गेल्या दहा वर्षापासून कार्यरत एकूण ११० कंत्राटी सफाई कर्मचारी आहेत. त्यात ३० कर्मचारी दुसऱ्या जिल्ह्यातील असून उर्वरित कर्मचारी चोपडा शहरातील आहेत.. या कर्मचाऱ्यात दलित कर्मचाऱ्यांच्या भरणा असून त्यांना कसलेही नोकरीची शाश्वती नाही संरक्षणाची साधने देखील नाहीत तरीही या कर्मचाऱ्यांना गेल्या दहा वर्षापासून कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करून घेतले जात आहेत. शोषण केले जात आहे परंतु महाराष्ट्र शासनाने व नगरपालिका खात्याने कंत्राटे न देता कामगार वर्ग बाबत ज्या अटी शर्ती घातलेल्या आहेत त्यानुसार या कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळते ना साप्ताहिक सुट्टी ना आजारपणाचे रजा तसेच प्राव्हिडंट कर्मचाऱ्यांच्या पगारातूनच कापला जातो पण व्यवस्थापनाकडून नाही प्रॉ. फंडाच्या हिस्सा भरला जावला पाहिजे आजमितीस या कर्मचाऱ्यांना फक्त २०० ते २७५ रुपये वेतन मिळते या कर्मचाऱ्यांमध्ये गटार काढणारे कामगार झाडू कामगार घनकचरा वाहून नेणारे कामगार वाहक यांच्या समावेश आहे या कर्मचाऱ्यांना कायद्याने असलेले हक्क व अधिकार मिळावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य आयटी राज्य उपाध्यक्ष काँग्रेस अमृत महाजन यांनी केली असून सर्व मागण्यांचे सविस्तर निवेदन माननीय जिल्हाधिकारी नगरपालिका यांना पाठवलेले आहे निवेदनात खालील मागण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे या घनकचरा व्यवस्थापन कंत्राटी सफाई कामगार यांना महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेले किमान वेतन  विशेष भत्ता लागू करून वेतन मिळावे  त्यांच्या नावाने स्वतंत्र बँक अकाउंट वर पगार मिळावेत दरमहा १ ते १० तारखेच्या आत पगार मिळावेत. साप्ताहिक सुट्टी भर पगारी मिळावी त्यांना आयएसआयसी नंबर मिळावा.. कर्मचाऱ्यांना आजारपणाची सुट्टी मिळावी .. त्यांना नगरपालिका सेवेत कायम नगरपालिकेतून कंत्राटीकरण खाजगीकरण रद्द करा आदि मागण्यांच्या समावेश आहे नासिक कॉम्रेड महाजन यांनी  केलेल्या पत्रकात म्हटले आहे

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...