Tuesday 11 June 2024

वसई तालुक्यातील युवती - महिलांसाठी मोफत प्रशिक्षण केंद्राचे उध्दघाटन !!

वसई तालुक्यातील युवती - महिलांसाठी  मोफत  प्रशिक्षण केंद्राचे उध्दघाटन !!

नालासोपारा, प्रतिनिधी :- धनंजय गावडे मित्र मंडळ, जिजाऊ संस्था, सखी ग्रुप यांच्या वतिने वसई तालुक्यातील युवती व महिलांसाठी मोफत शिवणकाम (टेलरींग) मेहंदी प्रशिक्षण व ब्युटी पार्लर प्रशिक्षण केक मेकींग प्रशिक्षण केंद्राचे  उध्दघाटन नालासोपारा समेळगाव येथे मा.नगरसेवक धनंजय गावडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ ही महिलांचे महत्त्व सांगणारी म्हण आता जुनी झाली असून ‘ज्या कुटुंबांची महिला कमावती, त्या कुटुंबाची होईल प्रगती’ ही म्हण आता लागू झाली आहे. महिलांच्या बचतीवर कुटुंबाचा गाडा चालतो. 
महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे म्हणजे घर आणि कुटुंब सक्षम करणे आहे. 

महिला फक्त चुल, मुल,घर या चौकटीत न राहता तिच्या  कलागुणांना वाव मिळावा या हेतूने महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्या संकल्पनेतून उध्दघाटन करण्यात आले.
तसेच अल्प दरात अडवान्स प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे.
महिलाना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन आर्थिक दृष्ट्या महिला सक्षमीकरण करून त्यांना सक्षम बनवण्यासाठी धनंजय गावडे साहेब नेहमीच सहकार्य करत असतात.

आजकालच्या धावत्या युगामध्ये अनेक महिला प्रशिक्षणाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि त्यांच्या मध्ये एकोपा वाढण्यात मदत होते. यावेळी  मा नगरसेवक दिवाकर सिंग, रमेश दादा मल्हार दादा महिला शहरप्रमुख रूचिता नाईक, अमित नाईक प्रशिक्षक संगिता गुर्जर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...