Tuesday 11 June 2024

स्वतंत्र आंबेडकरी राजकारणाला गाडून संविधान संरक्षण कसे होणार? - *ॲड.डॉ. सुरेश माने*

स्वतंत्र आंबेडकरी राजकारणाला गाडून संविधान संरक्षण कसे होणार? - *ॲड.डॉ. सुरेश माने*

नागपूर : दि.१० जुन २०२४

महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाभीमानी संघर्षामुळे व स्वतंत्र भुमिकामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी इतर राजकीय पक्षापासून दुर राहून स्वतंत्र स्वःअस्तीत्वाचे व स्वअस्मीतेचे राजकारण यशस्वी केल्याशिवाय राज्यघटनात्मक अधिकार व हक्क बहुजन समाजाला प्राप्त होणार नाहीत आणि त्याव्दारे देशातील सत्ता संपत्तीमध्ये बहुजनांना वाटा नाकारला जाईल या रास्त भविष्यवाणीमुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने स्वतंत्र राजकारणाचा पुरस्कार केला हे सत्य असतांना स्वतःच्या स्वतंत्र राजकारणाचा पाया उध्वस्त करून संविधान बचाव किंवा लोकतंत्र बचाव या एकमात्र नावाखाली बहुजन समाजाच्या पदरात काहीही पडले नसताना बहुजन समाजाने आपल्या घटनात्मक मताधिकाराची खैरात करावी व इतरांचे राजकारण मालामाल करावे आणि स्वतः मात्र राजकीय दृष्ट्या अपंग व्हावे, शिवाय आपले कार्यकर्ते आणि साधने व समाजमन इतरत्र वळवावे हे भाजपाच्या भीतीपोटी व काही दलित नेत्यांच्या बिकाऊपना पोटी व नैराश्य पोटी स्वीकारलेल्या आंबेडकर वाद्यांच्या भुमिकेमुळेच महाराष्ट्रात दिवसेंदिवस आंबेडकरी चळवळ व राजकारण हे कमजोर होत चाललेले आहे असा घनाघाती आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड. डॉ. सुरेश माने यांनी नागपूर येथे बीआरएसपीच्या विदर्भस्तरीय निवडणूक समिक्षा कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्षपदावरून बोलतांना अनेक उदाहरणासह केला. अशाच प्रकारच्या सामाजीक आर्थिक सुरक्षतेअभावी भितीग्रस्त मुस्लीम समाजाने देशभर व महाराष्ट्रात मुस्लीमांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व व शक्ती संपुष्टात आणली तर देशभरातील एक-दोन अपवाद वगळता संपूर्ण आदिवासी समाजात स्वतंत्र राजकीय शक्ती निर्माणच झालेली नाही याचे भान आंबेडकरवादी समाजघटकांनी ध्यान्यात घ्यावे असे आवाहनही केले.
यापसंगी पक्षाच्या विदर्भातील निवडणूक निकालावर भाष्य करतांना त्यांनी पुढे स्पष्ट केले की इंडीया आघाडीतील आप, काँग्रेस, डावे पक्ष यांनी स्वताःचे अस्तित्व शिल्लक ठेवून एकमेका विरोधात बंगाल, केरल व इतर राज्यात निवडणूका लढविल्या महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी इतर पक्षासाठी जागा न सोडता स्वतःचे प्राबल्य टिकविले. मराठासमाजघटकाने मराठा जात समुहाचे लोकसभा उमेदवार निवडून येतील याची विशेष खबरदारी घेतली या परिस्थीतीत राज्यातील आंबेडकरी समुहाने अशी कोणतीही भुमिका न स्वीकारता इंडिया आघाडीच्या संविधान बचाव या प्रचाराला बळी न पडून भावनेच्या लाटेवर स्वार होऊन घटना व लोकशाही रक्षणाचे कार्य अशा पक्षावर सोपविले की ज्या पक्षानी महाराष्ट्रात बार्टीला उध्वस्त केले, मागासवर्गीय कर्मचा-यांचे पदोन्नती आरक्षण २०१७ पासून रद्द केले, अनु.जाती / जमातींना कोणत्याही बजेटमध्ये लोकसंख्या प्रमाणात निधी दिला गेला नाही, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजने अंतर्गत भुमिहीनांना जमीन वाटप केले नाही, गायरान शासकीय जमीन अतिक्रमण धारक यांचे गंभीरपणे नियमन केले नाही, विदर्भातील खैरलांजीच्या हत्याकांडा पासून मुंबईतील रमाबाई हत्याकांड व भीमा कोरेगाव दंगल आरोपी यांना कधीही शिक्षा घडविल्या नाही, निरपराध दलित तरूण वरील भीमा कोरेगाव सारख्या प्रकरणामध्ये दाखल केलेल्या खोट्या केसेस रद्द केलेल्या नाहीत, ज्या पक्षानी मुस्लीमांचे स्वतंत्र पाच टक्के शैक्षणिक आरक्षण कधीही राबविले नाही, राज्य विधीमंडळात ओबीसी जनगणना ठराव पास करून केंद्राकडे पाठविला नाही, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ केली नाही, महाराष्ट्रातील सरकारी नोक-यांचे कंत्राटीकरण व खाजगीकरण थांबविले नाही उलट वाढविले किंवा शेतकरी विरोधी काळे कायदे निषेधाचा विधानसभेत साधा ठराव सुध्दा पास केलेला नाही. अशा राजकीय पक्षाच्या घराणेशाहीचा किल्ला जोपासत भाजपच्या राज्यघटना षडयंत्र विरोधी प्रचार यंत्रणा राबवून मतांची लईलुट करून घेतली हा कितपत सुज्ञपणा होय असा सवाल जाहीररित्या त्यांनी केला. याप्रसंगी बीआरएसपी च्या विदर्भातील पक्षाच्या निवडणूक प्रगतीची समिक्षा करतांना पक्ष संघटनेत आवश्यक बदल व सुधारणा करण्यासाठी व आगामी निवडणुकांची तयारी करण्यासाठी दिनांक २२-२३ जुन रोजी पक्षाचे दोन दिवसीय नियोजीत शिबीर आणि सदस्यता अभियान विदर्भात पार पाडले जाईल याचीही घोषणा त्यांनी केली. याप्रसंगी मेळाव्यामध्ये पक्षाच्या लोकसभा उमेदवाराशिवाय पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील, आदिवासी नेते लटारू मडावी, यांनी देखील समयोचीत विचार व्यक्त केले.


BRSP केंद्रिय कार्यालय, मुंबई.
🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...