Wednesday 12 June 2024

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू !!

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू !!

          
रायगड, प्रतिनिधी :-  सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व  परिचालन या मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रायगड - अलिबाग येथे  दिनांक 1 जुलै 2024 पासून प्रशिक्षणाच्या सुरु होणा-या प्रशिक्षण सत्रासाठी रायगड जिल्ह्यातील युवकांकडुन 30 जून 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे प्रशिक्षणा अंतर्गत प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण केंद्राच्या 57 फुट लांबी असलेल्या, 63.35 टनेज क्षमंतेच्या सिलेंडर संख्या 6 व 205 अश्वशक्तीचे इंजीन असलेल्या "मत्स्यप्रबोधिनी" नोंदणी क्र. IND-MH-3-MM-4266 या प्रशिक्षण नौकेद्वारे सागरी सफरीवर नेवुन प्रात्यक्षिक व सिध्दांतिक ज्ञान दिले जाते. त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

प्रशिक्षण कालावधी- 01-07-2024 ते 31-12-2024 (6 महिने) आहे.

आवश्यक पात्रता खालील प्रमाणे आहे. 

उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे. आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे. तसेच विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी. उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे.  प्रशिक्षण शुल्क :- i) प्रतिमाह रु. 450/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु. 2700/- मात्र. ii) दारिद्रय रेषेखालील असल्यास प्रतिमाह रु.100/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु. 600/- मात्र.  (दारिद्रय रेषेखालील उत्पन्नाचा गटविकास अधिकारी यांचा दाखला जोडावा.)  

प्रशिक्षनमुळे रोजगार  स्वयंरोजगाराच्या संधी असून i) राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थसहाय्य घेवून मच्छिमारी नौका बांधता येते. ii) सरकारी किवा खाजगी  विभागांच्या सागरी नौकांवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध होवू शकते. 

संपर्कासाठी पत्ता- :- श्री. धीरज शहुराव भोयर, यांत्रिक निदेशक, रायगड अलिबाग, 102/103, समृध्दी को-ऑप. हौसिंग सोसायटी, घरत आळी, एस.टी.स्टँडजवळ, रायगड अलिबाग, मु. पो. ता. अलिबाग, जि. रायगड. पिन - 402201
ईमेल : ftoalibag@rediffmail.com  मोबाईल व Whas app क्र. - 9860254943.

तरी इच्छुक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किंवा मोबाईल व Whas app क्र. 9860254943 सपंर्क साधल्यास विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध  करुन देण्यात येइल. अर्ज स्वत:चे हस्ताक्षरात भरुन त्यावर संस्थेची शिफारस घेऊन दिनांक 30-06-2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाचे दिवशी वर नमुद Whas app किवा ईमेल सादर करावेत, असे गणेश शंकर टेमकर, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रायगड - अलिबाग यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...