Wednesday 12 June 2024

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसी न केलेल्यांसाठी गावपातळीवर विशेष मोहिम !!

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसी न केलेल्यांसाठी गावपातळीवर विशेष मोहिम !!

पुणे, प्रतिनिधी :- प्रधानमंत्री किसान  योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा 17 वा हप्ता वितरणापूर्वी स्वत:   बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या लाभार्थींनी सदर बाबींची पूर्तता 5 ते 15 जून, 2024 या कालावधीत या विशेष मोहिमेमध्ये करून घेण्याचे आवाहन  शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे 

शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये)  2000 रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000 रुपये लाभ अदा करण्यात येते.लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे eKYC केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. या योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या या तिन्ही बाबींची पूर्तता राज्यातील 90 लाख 20  लाभार्थ्यांनी केलेली आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 05 जून, 2024 ते 15 जून, 2024 या कालावधीत या बंधनकारक बाबींची उर्वरित लाभार्थींनी पूर्तता करण्यासाठी गावपातळीवर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये लाभार्थींची स्वयं नोंदणी व e-KYC साठी राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र (CSC) तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे.

त्यानुसार भूमी अभिलेख नोंदीनुसार (RoR नुसार) जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या लाभार्थींनी सदर बाबींची पूर्तता या विशेष मोहिमेमध्ये करून घ्यावी. यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या (Land Seeding - No) लाभार्थींनी संबंधित तलाठी / तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. त्याचप्रमाणे eKYC व बँक खाती आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र (CSC) व इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) च्या मार्फत कार्यपूर्तता करावी, असे विकास पाटील,कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...