Friday 7 June 2024

सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती चेतन भंडारी यांनी मित्रपरिवार व आप्तेष्ट यांच्यासोबत केला सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या विजयाचा जल्लोष !!

सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती चेतन भंडारी यांनी मित्रपरिवार व आप्तेष्ट यांच्यासोबत केला सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या विजयाचा जल्लोष !!



कल्याण, सचिन बुटाला : भिवंडी लोकसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला असून सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी सतत दोनदा खासदार राहिलेले भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पराभव केला आहे. भिवंडी लोकसभा क्षेत्राकरिता यंदा (शरच्चंद्र पवार) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना संधी देण्यात आली होती.

विकास हवा तर चेहरा नवा हे उद्दिष्ट घेऊन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना निवडून आणण्याकरिता खूप मेहनत घेतली होती आणि मागील कित्येक वर्षांपासून बाळ्या मामा हे लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात होतेच तसेच त्यांचे सामाजिक कार्य व अडीअडचणीला नागरिकांना मदत करण्याची वृत्ती याचा फायदा सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना झाला. 

निवडणुकीच्या निकालाचे उत्साह भिवंडी लोकसभा क्षेत्राच्या प्रत्येक ठिकाणी करण्यात येत असून कल्याण पश्चिम येथे सुद्धा सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती चेतन भंडारी यांनी त्यांच्या मित्रपरिवार व आप्तेष्ट यांच्या समवेत भव्य आतिषबाजी करून व लाडू वाटून विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...